Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भगवान अय्यप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या तुपाच्या विक्रीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून, केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (VACB) या प्रकरणाच्या तळाशी जाऊन एका महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. हा घोटाळा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ च्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मंदिराच्या दक्षता अधिकाऱ्यांनी केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात (Audit) पैशांची मोठी तफावत दिसून आली. या प्रकरणी त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे (TDB) काउंटर इन्चार्ज सुनील पोटी यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. भाविकांना दिल्या जाणाऱ्या 'आथिया षष्ठम' प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या हिशेबात ही गडबड झाली आहे.



असे आहे घोटाळ्याचे गणित


सबरीमाला मंदिरात भाविक नारळ आणि तूप अर्पण करतात, ज्याची पुनर्विक्री बोर्डाद्वारे १०० मिलीच्या पॅकेटमध्ये केली जाते. प्रत्येक पॅकेटची किंमत १०० रुपये निश्चित आहे.


विक्रीसाठी आलेली पाकिटे : १७ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २०२५ दरम्यान ३,५२,०५० पाकिटे पॅक केली गेली.


विक्रीची नोंद : मराठमठ इमारतीतील काउंटरवरून ८९,३०० पाकिटांची विक्री झाल्याचे दाखवण्यात आले.


रुपयांचा हिशेब : नियमानुसार ८९,१२९ पाकिटांचे पैसे जमा व्हायला हवे होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी केवळ ७५,४५० पाकिटांचीच रक्कम जमा केली.


अपहार : तब्बल १३,६७९ पाकिटांचे पैसे, म्हणजेच अंदाजे १३ लाख ६७ हजार ९०० रुपये तिजोरीत जमा झालेच नाहीत.



न्यायालयाची कडक टिप्पणी


उच्च न्यायालयाने या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, "इतक्या कमी कालावधीत झालेली ही तफावत केवळ हिशेबातील चूक असू शकत नाही. यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही." कंत्राटदाराला पाकीट बनवण्यासाठी मिळणारे २० पैसे आणि बोर्डाचे साहित्य असतानाही झालेला हा अपहार चिंताजनक आहे. आता या घोटाळ्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत, हे दक्षता विभागाच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा

जलद डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर सरकारची भूमिका; क्विक कॉमर्स कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने