ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहादींची भाषा

राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन


मंत्री नितेश राणेंचा घणाघात


मुंबई : ‘ठाकरे बंधूंची भाषा आणि जिहाद्यांच्या भाषेत आता काहीच फरक उरलेला नाही. ‘व्होट जिहाद’च्या माध्यमातून हिंदू समाजाला डिवचण्याचे काम सुरू असून, राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदानातून या प्रवृत्तींना धडा शिकवावा’, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केले.


नितेश राणे म्हणाले की, लोकसभेपासून सुरू झालेला धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रकार आता महापालिका निवडणुकांपर्यंत पोहोचला आहे. जर चुकूनही यांच्या विचारांचा महापौर खुर्चीवर बसला, तर मुंबई-ठाण्याचे पूर्णपणे ‘हिरवेकरण’ होईल. सगळीकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आणि ‘सर तन से जुदा’चे नारे ऐकू येतील. इतकेच नाही तर, सत्ता त्यांच्या हातात गेली तर उद्या मुंबई-ठाण्यात सण-उत्सव साजरे करणेही कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.


ठाकरे गटावर दुटप्पीपणाचा आरोप करताना मंत्री राणे म्हणाले, ‘एकीकडे संविधानाची भाषा करायची आणि दुसरीकडे बुरखेवाला महापौर करण्याची स्वप्ने पाहायची, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हवे आहे की शरिया कायदा लागू करायचा आहे?,’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.


भेंडी बाजारात बोगस मतदार शोधा


बोगस मतदारांचे पाय तोडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे बंधूंना राणे यांनी खुले आव्हान दिले. ते म्हणाले की, ‘जर हिंमत असेल तर आधी भेंडी बाजार, नळ बाजार आणि बेहराम पाडा यांसारख्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन उभे राहा. तिथे एकाच व्यक्तीने बुरखा घालून १५-१५ वेळा मतदान केल्याचा इतिहास आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व मनात असेल, तर तिथे जाऊन बोगस मतदान रोखून दाखवा’, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र