मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक


मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन प्रकारासारखे आहे. मराठी भाषेबाबतचा आमचा दृष्टिकोन "आम्ही आपले आपण" असा अनेकवचनी आणि व्यापक असून त्यात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मराठी सकारात्मकता पसरवणारे आहे ज्यातून मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार अपेक्षित आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. विरोधकांवर कडक शब्दांत टीका करताना चव्हाण यांनी मराठी भाषेचे राजकारणच करू नका कारण हा विषामृत असा खेळ नाही. विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली असून ज्ञानेश्वर माऊलींच्या "विश्वात्मके देवे" या वैश्विक तत्त्वाशी त्यांची बांधिलकी नसल्याचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.

भाजपा आणि मराठी माणूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. वास्तविकपणे मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा असून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी भाषिक थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित देश आणि समाज घडविण्याचे काम भाजपा वर्षानुवर्षे करत आहे असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले.
Comments
Add Comment

Sunil Tatkare: 'हा फक्त एक उमेदवारी अर्ज नाही, तर अजितदादांनी निवडलेल्या विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्धार'

बारामती: राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज बारामती विधानसभा

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती: महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू