Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारातील गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ११० गॅस सिलिंडर चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.


चोरीस गेलेल्या सिलिंडरची अंदाजे किंमत साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे एकीकडे नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या चोरीचा अधिक तपास सुरू आहे.



जवळपास ४ लाख ५१ रुपये किमतीचा मुद्देमालही चोरी



पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी गॅस एजन्सी बंद असताना मध्यरात्री ही चोरी झाल्याची शक्यता आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत जवळपास ९६ घरगुती सिलेंडर तसेच १२ निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर आणि ५ किलोचे दोन व्यवसाय सिलेंडर असे एकूण ११० गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत, जवळपास ४ लाख ५१ रुपये किमतीचा हा मुद्देमाल चोरीला गेला असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.



घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य



पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. गॅस एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही संबंधित ऑईल कंपनीचे अधिकृत ॲप आणि 'Aadhaar FaceRD' ॲप वापरून घरबसल्या ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करू शकता. यामुळे तुमची गॅस सबसिडी विनाव्यत्यय सुरू राहील. घरगुती LPG ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले असून, पेट्रोलियम मंत्रालयाने बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाद्वारे हे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया Indane, Bharat Gas किंवा HP Gas च्या मोबाइल ॲपद्वारे मोफत आणि घरबसल्या करता येते. यामुळे सबसिडी सुरू राहण्यास मदत होईल आणि गॅस पुरवठ्यातील अडचणी दूर होतील. ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. सबसिडी मिळवण्यासाठी आणि गॅस सिलिंडर मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी हे करणे आवश्यक आहे. मोबाईलवर काही मिनिटांतच ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व