भारतातील ८४% प्रोफेशनल्‍सना वाटते की, ते २०२६ मध्‍ये रोजगार शोधण्‍यासाठी पूर्णपणे सुसज्‍ज नाहीत: लिंक्‍डइन

प्रतिनिधी: एकूण रोजगार बाजारातील परिस्थितीत स्थित्यंतरे होत असताना, लिंक्‍डइन इंडियाने एक अनोखा अहवाल बाजारात सादर केला आहे. भारतातील ८४% रोजगार शोधत असलेल्या लोकांना अथवा प्रोफेशनल्‍सना वाटते की ते नवीन रोजगार शोधण्‍यासाठी पूर्णपणे सुसज्‍ज नाहीत तर ७२% प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की ते २०२६ मध्‍ये सक्रियपणे नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत. हायरिंग प्रक्रियेमध्‍ये एआयचा वाढता वापर आजच्‍या रोजगारांसाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांमध्‍ये झपाट्याने होत असलेले बदल आणि मोठ्या प्रमाणात स्‍पर्धात्‍मक, पण निवडक रोजगार बाजारपेठेदरम्‍यान ही माहिती निदर्शनास आली आहे. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn) च्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की,अनेक प्रोफेशनल्‍सना एआयवर अवलंबून असलेल्या हायरिंग प्रक्रियेमध्‍ये अयशस्‍वी ठरणार असे वाटते. ८७% प्रोफेशनल्‍सना कामाच्‍या ठिकाणी एआयचा वापर करणे कम्फर्ट वाटते, तर अनेकांना हायरिंगमध्‍ये एआयचा वापर करण्‍याबाबत खात्री नाही. ७७% प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की प्रक्रियेमध्‍ये खूप टप्‍पे आहेत, तर ६६% प्रोफेशनल्‍सना ते मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून असल्‍यासारखे वाटते. रिक्रूटरकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा कालावधी आणि अभिप्रायाचा अभाव यामुळे उमेदवारावात अस्वस्थता वाढते व अधिक अस्‍वस्‍थ बनवते असाही निष्कर्ष अहवालाने स्पष्ट केला आहे. त्यामुळेच सर्व पिढ्यांमधील प्रोफेशनल्‍सना त्‍यांचा अर्ज इतरांपेक्षा वरचढ कसा ठरवावा याबाबत समान संघर्ष करावा लागत आहे. अहवालानुसार ४८% प्रोफेशनल्‍सनी मान्‍य केले आहे.


लिंक्‍डइन संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील प्रोफेशनल्‍सना एआय उत्‍पादकता वाढवणारे नाही तर आत्‍मविश्वास निर्माण करणारे साधन बनले आहे. ९४% प्रोफेशनल्‍स त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये एआयचा वापर करण्‍याचे नियोजन करत आहेत आणि ६६% प्रोफेशनल्‍स म्हणतात की, यामुळे त्‍यांचा मुलाखतीदरम्‍यान आत्‍मविश्वास वाढला आहे. जवळपास ७६% रिक्रुटर म्हणत आहेत की, गेल्‍या वर्षभरात नवीन रोजगार शोधणे अधिक आव्‍हानात्‍मक बनले आहे.लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की २०२२ च्या सुरुवातीपासून भारतात प्रत्येक उपलब्ध नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे ज्यामुळे स्पर्धा तीव्र झाली असून अनेक उमेदवारांमध्ये आपण या स्पर्धेसाठी तयार नसल्याची भावना निर्माण झाली आहे. फक्‍त रोजगार शोधणाऱ्यांवर हा दबाव आहे असे नाही. भारतातील जवळपास ७४% रिक्रूटर्स म्हणतात की, गेल्या एका वर्षात पात्र उमेदवार शोधणे अधिक आव्‍हानात्‍मक झाले आहे.


या आव्‍हानामुळे करिअरचे मार्ग बदलत आहेत. जवळपास एक-तृतीयांश (३२%) जनरेशन एक्स नोकरीसाधक नवीन कार्यक्षेत्रे किंवा रोजगारांचा विचार करत आहेत, तर ३२% जनरेशन झेड तरुण त्यांच्या सध्याच्या क्षेत्राबाहेर नोकरी शोधत आहेत. तसेच अनेक व्‍यक्‍ती पारंपारिक नोकऱ्यांच्या पलीकडे जाऊन उद्योजकतेकडे वळत आहेत, ज्यामुळे लिंक्डइनवर संस्थापक हे पद वेगाने वाढताना दिसत आहे.


लिंक्‍डइन करिअर तज्ञ आणि लिंक्‍डइन इंडिया न्‍यूजच्‍या वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या आहेत की, एआय आज भारतातील रोजगार बाजारपेठेत करिअर घडवण्‍याच्‍या आणि प्रतिभावान व्‍यक्‍तीचे मूल्‍यांकन करण्‍याच्‍या पद्धतीचा पाया बनले आहे. प्रोफेशनल्‍सना त्‍यांच्‍या कौशल्‍यांमधून योग्‍य संधी कशाप्रकारे मिळेल आणि हायरिंग निर्णय कशाप्रकारे घेतले जातात हे स्‍पष्‍टपणे समजणे गरजेचे आहे. उद्देशासह वापर केल्‍यास एआय टूल्‍स तफावतीला दूर करू शकतात, तसेच व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍यासाठी योग्‍य असलेले रोजगार ओळखण्‍यास मदत करू शकतात, उद्देशासह सुसज्‍ज करू शकतात आणि सर्वात महत्त्वपूर्ण ठिकाणी त्‍यांच्‍या ज्ञानाचा वापर करण्‍यास मार्गदर्शन करू शकतात. यासंदर्भात लिंक्‍डइनवर नोकरी व नियोक्‍त्‍यांना (Employers) काळाची गरज ओळखून एकत्र येण्‍यास मदत करते.'


दुसरीकडे स्‍पर्धा वाढत असताना लिंक्‍डइन जॉब्‍स ऑन द राइज कोणते रोजगार किंवा भूमिका वाढत आहेत, हे निदर्शनास आणतेरिक्रूटर्सला २०२६ मध्ये मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइनचा जॉब्‍स ऑन द राइज अहवाल गेल्‍या ३ वर्षांमध्‍ये झपाट्याने विकसित झालेल्‍या पदाचे महत्व निदर्शनास आणतो. यंदाच्‍या लिस्‍टमध्‍ये प्रॉम्‍प्‍ट इंजीनिअर (#1), एआय इंजीनिअर (#2) आणि सॉफ्टवेअर इंजीनिअर (#3) ही पदे आघाडीवर आहेत असून ज्‍यामधून एआय व टेक टॅलेंटसाठी स्थिर मागणी दिसून येते. प्‍युअर टेक व्‍यतिरिक्‍त रँकिंग्‍जमधून विक्री व ब्रँड धोरण, सायबरसुरक्षा व सल्‍लागार कार्यक्षेत्रांमधील उत्तम मागणी दिसून येते. तसेच पशुवैद्य, सोलर सल्‍लागार व बीहेविरल थेरपीस्‍ट अशा पदांसाठी मागणी देखील वाढत आहे असेही पुढे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


लिंक्‍डइनचे एआय टूल्‍स रोजगार शोधण्यासाठी आणि सुयोग्‍य नोकरी मिळण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करत आहेत असेही निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. लिंक्‍डइन एआय टूल्‍सची व्‍यापक श्रेणी देखील उपलब्धता वाढवते. एआय संबंधित जॉब सर्च जे सदस्‍यांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या भाषेमध्‍ये रोजगार शोधण्‍यास आणि कधीच विचार न केलेल्‍या पदांचा शोध घेण्‍यास मदत करते. तसेच हे टूल आता जागतिक स्‍तरावर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्‍पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांमध्‍ये सादर करण्‍यात येत आहे.


जागतिक स्‍तरावर १.३ दशलक्षहून अधिक सदस्‍य दररोज या टूलचा वापर करत आहेत आणि दर आठवड्याला २.५ दशलक्षहून अधिक सदस्‍य नवीन रोजगाराचा शोध घेत ओहत. याविषयी प्रकाश टाकताना लिंक्‍डइन अहवालात म्हटले गेले आहे की,'संबंधित पदांचा शोध घेतल्‍यानंतर तुम्‍ही लिंक्‍डइनच्‍या जॉब मॅच वैशिष्‍ट्याचा वापर करत कोणते पद तुमची कौशल्‍ये व पात्रतांनुसार आहे हे पाहू शकता ज्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍यासाठी योग्‍य असलेल्‍या पदाकरिता अर्ज करू शकता आणि त्‍या पदासाठी निवड होण्‍याची शक्‍यता अधिक असू शकते.'


अहवालानुसार,व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट टिप्‍स काय आहेत?      


आत्‍मविश्वासाने रोजगाराचा शोध घ्‍या: कृतीशील सल्‍लाआमचे टूल्‍स वापरण्‍यासंदर्भात मार्गदर्शन, मोफत कोर्सेसची उपलब्‍धता अशा सुविधेसाठी linkedin.com/jobsearchguide येथे भेट द्या.


काळाची गरज ओळखा: रोजगार बाजारपेठ झपाट्याने बदलत आहे, म्‍हणून सुसज्‍ज राहण्‍यासोबत कृती करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. तुमच्‍या क्षेत्रातील ट्रेण्‍ड्स पाहण्‍यासह सुरूवात करा आणि तुम्‍हाला पाहिजे असलेल्‍या नवीन रोजगाराबाबत विचार करा. तुम्‍हाला नवीन रोजगार मिळण्‍यास मदत करणारी कौशल्‍ये ओळखा आणि आजच धाडसी पाऊल उचलत आत्‍मविश्वासाने पुढे जा.


तुमच्‍या रोजगार शोधामध्‍ये एआयचा उत्तमपणे वापर करा: एआय रोजगार शोधणे, रिक्रूटर्सकडून होणारी प्राथमिक चाचणी आणि मुलाखतीसाठी तयारी अशा रोजगार शोधाच्‍या प्रत्‍येक भागाला आकार देत आहे. लहान बाबीपासून सुरूवात करणे महत्त्वाचे आहे. योग्‍य पदासाठी तुमच्‍या शोधाला गती देण्‍यासाठी लिंक्‍डइनच्या जॉब मॅच टूलचा वापर करून पाहिला तर?


तुमचे प्रोफाइल अद्ययावत ठेवा:अनेकदा नियोक्‍ते (Employers) प्रथम तुमचा प्रोफाइल पाहतात. तुमची कौशल्‍ये व अनुभव अद्ययावत असण्‍यासोबत स्‍पष्‍टपणे निदर्शनास येतील याची खात्री घ्‍या आणि कामाचे ठिकाण, नियोक्‍त्‍यांमध्‍ये विश्वास निर्माण करण्‍यासाठी ओळख अशी माहिती तपासा. हे तुम्‍हाला स्‍पर्धेमध्‍ये पुढे राहण्‍यास महत्त्वाचे ठरेल.


टॉप चॉईस रोजगाराची नोंद करा: तुम्‍ही प्रीमियम सबस्‍क्रायबर असाल तर ईजी अप्‍लायच्‍या माध्‍यमातून अर्ज करताना टॉप चॉईस म्‍हणून रोजगाराची नोंद करा, ज्‍यामुळे रिक्रूटर्सना त्‍यांनी पोस्‍ट केलेल्‍या रोजगारामध्‍ये तुम्‍हाला रूची असल्‍याचे समजू शकते. टॉप चॉईस निवडल्‍याने रिक्रूटरकडून संदेश मिळण्‍याची शक्‍यता ४३% आहे.


तुमच्‍या नेटवर्कचा आधार घ्‍या: तुमचे नेटवर्क शक्तिशाली साधन आहे. पोस्‍ट्स टाकणे, कमेंट करणे किंवा प्रत्‍यक्ष संपर्क साधणे यामुळे तुम्‍हाला पाठिंबा मिळू शकतो, संधी वाढू शकतात आणि तुम्‍हाला अपेक्षा नसलेले रोजगाराच्‍या संधी खुल्‍या होऊ शकतात. लिंक्‍डइनचे नवीन एआय-समर्थित पीपल सर्चचा वापर करा, सोप्‍या भाषेमध्‍ये व्‍यक्‍तींचा शोध घ्‍या आणि तुमच्‍या नेटवर्कची क्षमता वाढवा.


नवीन संधी शोधा: लिंक्‍डइनच्‍या जॉब्‍स ऑन द राइजमध्‍ये झपाट्याने वाढत असलेल्‍या पदांचा शोध घ्‍या, जेथे कृतीशील माहिती प्रोफेशनल्‍सना त्‍यांचा नवीन रोजगार शोधण्‍यास, तसेच प्रमुख कौशल्‍ये, हायरिंग हॉटस्‍पॉट्स, माहितीपूर्ण संसाधने, उपलब्‍ध रोजगारांसाठी लिंक्‍स अशा सुविधांसह मदत करतात.

Comments
Add Comment

क्वाड्रंट फ्युचर टेक शेअरमध्ये ९% वाढ 'या' कारणामुळे तरीही शेअर विकण्याचा तज्ञांचा सल्ला!

मोहित सोमण: क्वाड्रंट फ्युचर टेक शेअर्समध्ये आज तुफान वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर इंट्राडे ९% पातळीवर उसळला असून

सोन्याचांदीत 'हाहाःकार' सोने १ दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांने तर चांदी १५००० उसळत २९०००० प्रति किलोवर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोन्यातचांदीत हाहाःकार निर्माण झाला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरील

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

रेल्वे प्रवासासाठी ६% सवलत आजपासूनच लागू! लगेच रेलवन ॲप डाऊनलोड करा

मुंबई: रेल्वे प्रवाशांसाठी आज आनंदाची बातमी आहे. आज १४ जानेवारीपासून रेलवन ॲप डाऊनलोड केल्यास तिकीटावर एकूण ६%