उबाठाने मिनी कोकण भांडुपला बकाल केले!

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; १६ तारखेनंतर भांडुपमध्ये विकासाची गंगा आणू


मुंबई : कोकण नगर, भांडुप येथे झालेल्या सभेत मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी उबाठा आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “उबाठाने ‘मिनी कोकण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भांडुपला बकाल अवस्थेत नेले असून, १६ तारखेनंतर येथे विकासाची गंगा आणू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


राणे म्हणाले की, “पूर्ण राज्यभर प्रचार करत करत मी आता मिनी कोकणात, म्हणजेच भांडुपमध्ये येऊन थांबलो. कोकण आणि भांडुपमधील परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक आहे. कोकणातील घरे, रस्ते आणि निसर्ग सौंदर्य पाहा, आणि इथली परिस्थिती पाहा. येथील कोकणी माणसांची अवस्था बदलण्याची गरज आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली; मात्र त्यांच्या पुढील पिढीने त्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे मराठी माणूस मुंबईत का कमी झाला, याचे उत्तर उबाठावाल्यांनी द्यायला हवे. त्यांच्या सोबत फरफटत गेलेल्यांनीही (मनसे) त्यांना जबाबदार धरले पाहिजे. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनाही पटले आहे. त्यामुळे आता कोकणी माणसाने त्यांचा नाही, तर स्वतःचा विचार केला पाहिजे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.


कोकणातील लोकसभा आणि विधानसभा निकालांचा उल्लेख करत राणे म्हणाले, “कोकणातील जनतेने निर्धार केला आणि सर्व खासदार महायुतीचे निवडून आले. विधानसभेत फक्त भास्कर जाधव थोडक्या मतांनी निवडून आले. कोकणातील विकास भांडुपमध्ये पाहायचा असेल तर १५ तारखेला महायुतीशिवाय दुसरा विचार करू नका. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. तोच कणा मोडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. येत्या १६ तारखेला महायुतीचा महापौर बसल्यावर उद्धव ठाकरे बॅग पॅक करून लंडनला जातील”, असा दावाही त्यांनी केला.


शेवटी कोकणवासीयांना उद्देशून ते म्हणाले, “सरकारमध्ये तुमच्या या भावाचे वजन आहे. देवा भाऊंच्या आवडत्यांपैकी मी एक आहे. काळजी करू नका. १५ तारखेला फक्त ‘जय कोकण’ म्हणा आणि कमळ चिन्ह दाबा”, असे आवाहन देखील त्यांनी केले.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१