ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार


ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा जाहीर करत ठाणे शहराला स्मार्ट, सुरक्षित आणि ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वचननाम्यात सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत परवडणारी घरे, क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवणे, तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजप ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि विलास जोशी यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. आरोग्य, स्वच्छता, दवाखाने, सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम करण्याचे आश्वासन देण्यात आले असून मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, उन्नत मार्ग यांमुळे ठाण्याचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प वचननाम्यात मांडण्यात आला आहे. भविष्यात ३६० मीटर उंच लँडमार्क टॉवर, कन्व्हेन्शन सेंटर, डिजिटल युनिव्हर्सिटी, विज्ञान केंद्र, टाऊन पार्क आणि स्टेडियम उभारण्याचे नियोजन आहे.


रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग कल्याण, प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश वचननाम्यात करण्यात आला आहे. एकूणच ठाणेकरांना आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार जीवनशैली देण्यासाठी महायुतीचा हा वचननामा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Comments
Add Comment

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर