रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत


अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष एक मोठा आधारवड ठरला आहे. १ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत या कक्षाद्वारे ४७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक मदत रुग्णांना वितरित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या अहवालातून ही सकारात्मक माहिती समोर आली आहे.
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यलयात हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार खेटे मारावे लागतात. यात रुग्ण व नातेवाइकांची होणारी परवड थांबविण्याच्या उद्देशातून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजनेच्या माध्यमातूनही अनेक रुग्णांना उपचारांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मोठी कामगिरी केली आहे.


नमो नेत्र संजीवनी अभियान अंतर्गत १९९ शिबिरांद्वारे ५ हजार ९९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. श्री गणेशा आरोग्याचा अभियानातून १५३ शिबिरांच्या माध्यमातून ७ हजार ३४१ लाभार्थीची तपासणी झाली, तसेच रक्तदान अभियानातून आयोजित ५ रक्तदान शिबिरांतून २१२ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. दरम्यान, आरोग्य सेवेसोबतच नैसर्गिक आपत्तीमध्येही या कक्षाने योगदान दिले आहे. पूरग्रस्तांसाठी ८ लाख ९० हजार रुपयांच्या देणग्या जमा करून मदत पोहोचविण्यात आली, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रचारासाठी राबविलेल्या २२ उपक्रमांमध्ये ५ हजार ७७८ नागरिकांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे योजनेची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाशी सध्या ३८ रुग्णालये संलग्न असून, १५ रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे रायगडमधील सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळवणे सुलभ झाले.

Comments
Add Comment

Meta Layoff: मेटाकडून 'या' विभागात १०% कर्मचारी कपात जाहीर १५०० जणांना नारळ मिळणार

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सेंटर प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने मेटा (Meta) कंपनीने १५०० कर्मचाऱ्यांना नारळ

उबाठाची मते विकत घेण्याची धडपड, वरळीत केले पैसेवाटप

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी मतदान होणार आहे. प्रचाराला अवघे काही तास उरले आहेत. या परिस्थितीत

भारत विकासाच्या सुवर्णयुगात घसरती महागाई व वाढता विकास दर परंतु...

HSBC Global Investment Research रिपोर्ट- मुंबई: एचएसबीसी ग्लोबल इन्व्हेसमेंट रिसर्च संस्थेने भारतीय कालखंड आर्थिक सुवर्णकाळातून

Gold Silver Rate Update:सोन्याचांदीत सलग तिसऱ्यांदा विक्रमी वाढ! सोने १४२००० व चांदी २७५००० पार....

मोहित सोमण: सोन्याचांदीच्या दरात आजही तुफान वाढ झाली आहे. सलग तिसऱ्यांदा ही वाढ झाली असून इराण व युएस यांच्यातील

एचसीएल टेक्नॉलॉजीच्या निव्वळ नफ्यात ११% घसरण तरीही निकाल मजबूत कंपनीकडून १२ रूपये लाभांश जाहीर

मोहित सोमण: एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड (HCL Technologies Limited) या आयटी कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. एक्सचेंज

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही