BMC निवडणुकांचा थेट फटका WPL ला; १४-१५ जानेवारीचे सामने ‘क्राउडलेस’?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मधील काही सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः १४ आणि १५ जानेवारी रोजी नियोजित सामन्यांबाबत बीसीसीआय आणि स्थानिक प्रशासनामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.


१५ जानेवारी रोजी मुंबईत बीएमसी निवडणुक होणार असून, याच दिवशी WPL मध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस मनुष्यबळ लागणार असल्याने क्रिकेट सामन्यांसाठी आवश्यक सुरक्षा देणं कठीण ठरणार असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.


या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं की, सामने रद्द करण्याचा किंवा वेळापत्रक बदलण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याचा असल्याने ‘क्राउडलेस’ सामने हा एक पर्याय मानला जात आहे. १४ जानेवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार असून, दुसऱ्या दिवशी यूपी वॉरियर्स पुन्हा मैदानात उतरत मुंबई इंडियन्सचा सामना करतील. दोन्ही सामने नवी मुंबईतील मैदानावर खेळवले जाणार आहेत.


पार्श्वभूमी पाहता, कोरोना काळात प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले गेले होते. त्यानंतर प्रथमच अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते. चाहत्यांचा उत्साह, तिकीट विक्री आणि स्थानिक वातावरणावर याचा परिणाम होण्याची शक्यता असली, तरी निवडणूक प्रक्रियेची सुरक्षितता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणं अधिक महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाचं मत आहे. बीसीसीआय लवकरच मुंबई पोलिस आणि राज्य प्रशासनाशी अंतिम चर्चा करून प्रेक्षकांबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे

Comments
Add Comment

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या

मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर

मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?

मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या

मुंबईतील ८५ लाख मतदारांना झाले मतदार ओळखपत्रांचे वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी

मुंबईत मतदान केंद्रासह परिसरही राखणार स्वच्छ

पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

उबाठाने मिनी कोकण भांडुपला बकाल केले!

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; १६ तारखेनंतर भांडुपमध्ये विकासाची गंगा आणू मुंबई : कोकण नगर, भांडुप येथे