वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था


वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला जवळपास २ ते ३ अपघात होत आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ कालावधीत रायगड पोलीस दुरक्षेत्र हद्दीत ६२७ अपघात झाले असून, या अपघातांमध्ये २५८ जणांचा मृत्यू झाला असून, ७८० जण जखमी झाले आहेत.


रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहन चालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आले तरी जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील वर्षभरात जिल्ह्यात ६२७ अपघात झाले असून, यामध्ये २५८ जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघातांची प्रमुख कारणे


१)  महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.
२) रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.
३) रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.
४) कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱ्या बाजूला नेणे.
५)मद्य पिऊन वाहन चालविणे धोकादायक वळणे.



रस्ते अपघात दृष्टिक्षेप


मार्ग अपघात मृत्यू जखमी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ९८ ३३ १३३

मुंबई पुणे जुना महामार्ग ४७ २० ४१

मुंबई गोवा महामार्ग १६० ५६ १७७

वडखळ अलिबाग १५ ३ ११

ताम्हिणी घाट माणगाव-दिघी ४५ २३ ५१

खोपोली वाकण-आगरदांडा ३२ १९ ५७

पेण खोपोली २५ १५ १५

अंतर्गत राज्यमार्ग ११६ ४६ १९०

इतर मार्ग ११४ ४३ १०५
Comments
Add Comment

काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक; एनआरआय महिलेच्या तक्रारीवरून तिसरं प्रकरण उघड

पथनमथिट्टा (केरळ) : काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि आमदार राहुल ममकुटाथिल यांना महिलेशी गैरसंबंधान बाबत गंभीर

Top Stocks to buy: मालामाल होण्यासाठी मोतीलाल ओसवालकडून 'या' ३ शेअर खरेदीचा गुंतवणूकदारांना सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ३ शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात कुठले शेअर

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

BMC Election:बीएमसी निवडणुकीसाठी मुंबईत १,०६५ खास ‘बेस्ट’ बस सेवेत

मुंबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाज व्यवस्थित पार पाडावे यासाठी

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह