लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी


अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, व्यसनाधीनता, आर्थिक अडचणी, संशय, संवादाचा अभाव तसेच शारिरिक व मानसिक छळ यांसारख्या विविध कारणांमुळे सध्या विवाहित जोडप्यांमध्ये कलह वाढताना दिसत आहे. किरकोळ वादातून सुरू झालेले मतभेद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करून थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. अशा परिस्थितीत तुटण्याच्या मार्गावर असलेल्या संसारांना वाचविण्यासाठी रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लोकअदालतीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुढाकार घेत तुटणाऱ्या नात्यांना नवी दिशा लोकअदालतीतून मिळाली असून, वर्षभरात १९ संसार पुन्हा जुळले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतींमधून तब्बल १९ विवाहित जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ही नाती समुपदेशन, संवाद आणि तडजोडीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली असून, त्यामुळे संबंधित कुटुंबांचे भविष्य वाचले आहे. अनेकवेळा छोटे गैरसमज, अहंकार, संवादाचा अभाव आणि बाह्य हस्तक्षेप यामुळे वाद अधिक तीव्र होतात. हे वाद वेळेत मिटवले गेले नाहीत, तर त्याचे रुपांतर न्यायालयीन लढाईत होते. अशा प्रकरणांमध्ये पती-पत्नी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल करतात. मात्र, अंतिम निर्णयापूर्वी ही प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येतात. या न्यायालयीन वातावरणापेक्षा वेगळ्या, वातावरणात समुपदेशन केले जाते. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधला जातो. याच प्रक्रियेतून पती-पत्नींमधील दुरावा दूर करण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आलेे.

लोकअदालतीतील वर्षभराचा तपशील


२२ मार्च २०२५ रोजी झालेल्या लोकअदालतीत ४ संसार जुळले. १० मे २०२५ रोजी ५ संसार पुन्हा एकत्र आले. १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५ संसार जुळविण्यात यश मिळाले. १३ डिसेंबर २०२५ रोजी ५ संसार पुन्हा सुरळीत झाले. अशा प्रकारे वर्षभरात एकूण १९ संसार पुन्हा उभे राहिले.

गेल्या वर्षभरात झालेल्या चार लोकअदालतींमध्ये आम्हाला १९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आलेे. त्याचप्रमाणे आता पुन्हा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षात १४ मार्च रोजी लोकअदालत होणार असून, ज्या जोडप्यांना आपला संसार टिकविण्याची आशा आहे, त्यांनी या लोकअदालतीचा नक्कीच लाभ घ्यावा.
- तेजस्विनी निराळे
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी