नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ (Friedrich Merz) यांनी नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर जर्मनी व भारत यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी भारत व जर्मनी यांनी एकूण ५० अब्ज डॉलरचा टप्पा पार केल्या असल्याचेही यावेळी नमूद केले. एका कार्यक्रमात दोन्ही देशांच्या उद्योगपतींनी, विविध कार्यकारी अधिकारी यांनी या सीईओ फोरममध्ये उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे दिसून आले होते. यावेळी भारतात २००० कंपन्याहून अधिक जर्मन कंपन्यांचा समावेश असल्यामुळे भारत व जर्मनी यांच्या औद्योगिक संबंधांत मजबूती असल्याचे उद्धृत होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्या उपस्थितीत दोन्ही देशातील विविध व्यापारी सामंजस्य करारावर (Memoreundum of Understanding MoU) स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आहेत. तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य विकास, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, रिसर्च, शाश्वत विकास यांसारख्या अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांच्या संबंधात हितकारक व लाभदायक संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी दोन्ही देशांच्या धोरणकर्तांनी प्रयत्न करण्याचे ठरवले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आत्मविश्वास आज सकाळी भारत-जर्मनी सीईओ फोरममध्ये स्पष्टपणे दिसून आला असे म्हटले. हे केंद्र ज्ञान देवाणघेवाण, तंत्रज्ञान विकास आणि नाविन्यपूर्णतेसाठी एक सामायिक व्यासपीठ म्हणून काम करेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले आहेत.
तंत्रज्ञान सहकार्याच्या प्रकाश टाकताना, पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे की,दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान सहकार्य वर्षानुवर्षे अधिक मजबूत झाले आहे आणि त्याचा परिणाम आता जमिनीवर स्पष्टपणे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जर्मनीची अक्षय ऊर्जा क्षेत्रात समान प्राधान्ये आहेत आणि त्यांनी भारत जर्मनी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याच्या निर्णयाची घोषणा यावेळी केली.