मुंबई मनपा निवडणूक, भाजपाचा वाढता दबदबा, ठाकरे बंधूंची लागणार कसोटी

मुंबई : मुंबईत महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी यावेळी राजकीय लढत अधिक तीव्र झाली आहे. एका बाजूला भाजप आणि महायुती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती,असा थेट सामना रंगणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील राजकीय उलथापालथ पाहता, ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.


मुंबई मनपेसाठी अवघ्या काही दिवसांत मतदान पार पडणार असून १५ जानेवारीला मतदार मतदानाचा हक्क बजावतील, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. २२७ वॉर्डांमध्ये तब्बल १७००हून अधिक उमेदवार रिंगणात उतरले असले, तरी खरी राजकीय लढाई भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशीच पाहिली जात आहे.



राजकीय गणित बदलले, समीकरणं उलटली


२०१७ च्या मनपा निवडणुकीत शिवसेना (तेव्हाची एकसंध) आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. शिवसेनेने ८४ तर भाजपाने ८२ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसलाही फूट पडली आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचा गट प्रथमच स्वतंत्र ताकदीने मुंबई मनपाची निवडणूक लढवत आहे.


आपली संघटनात्मक ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही, याची जाणीव असल्याने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी मनसेशी युती केली. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने मराठी अस्मिता, भावनिक मुद्दे आणि मुंबईवरील हक्क यावर भर दिला जात आहे.



भाजपाचा विकासाचा अजेंडा


दुसरीकडे भाजप आणि महायुतीने निवडणूक प्रचारात थेट विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. मुंबईला ग्लोबल सिटी बनवण्याचा संकल्प, भक्कम इन्फ्रास्ट्रक्चर, सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारी घरं, आरोग्यसेवेचा विस्तार आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची आश्वासने भाजपाच्या वचननाम्यात आहेत. त्यामुळे भावनिक मुद्दे विरुद्ध विकास असा स्पष्ट राजकीय संघर्ष यावेळी पाहायला मिळतोय.



आकडे काय सांगतात?


मुंबई मनपाच्या मागील निवडणुकांचा आढावा घेतला, तर भाजपाची ताकद सातत्याने वाढताना दिसते.


२००७ मध्ये भाजप केवळ २८ जागांवर होती
२०१२ मध्ये हा आकडा ३१ वर गेला
२०१७ मध्ये भाजप थेट ८२ जागांपर्यंत पोहोचली


याउलट शिवसेनेची (उबाठा) ताकद स्थिर राहिली, तर आता पक्षफुटीनंतर ती अधिकच कमकुवत झाली आहे. मनसेने २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये २७ जागा जिंकल्या होत्या, मात्र २०१७ मध्ये पुन्हा घसरण होत केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे उबाठा–मनसे युती २०२६ मध्ये किती प्रभावी ठरणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.



निकाल ठरवणार महाराष्ट्राची दिशा?


मुंबई महानगरपालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही. ही निवडणूक अस्मितेची, वर्चस्वाची आणि राजकीय भवितव्याची आहे. ठाकरे बंधू भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखू शकतील का, की मुंबईत भाजप आपली सत्ता अधिक मजबूत करणाऱ्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नसून, तो महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Dombivli News : डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी, पादचाऱ्यांचे हाल

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेला स्टेशनकडे येण्याजाण्याच्या सर्व लहानमोठ्या रस्त्यांवर फेरीवाल्यांची आणि छोट्या

Bangladesh News : बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, तरुणाला बेदम मारहाण आणि विषबाधा; अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याचे

Nashik News: कडाक्याच्या थंडीने घेतला पहिला बळी, निफाडमध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु

नाशिक:निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगाव (ता. निफाड)

Cricket News: स्थानिक क्रिकेटपटुचा सामानादरम्यान मैदानातच मृत्यु; खेळता खेळता अचानक खाली पडला..

मिझोरममध्ये क्रिकेटसृष्टीत दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि वेंघनुई रेडर्स सीसीचे

कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे