मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी एका वेळी दोनच प्रभागांची मोजणी केली जाणार असून पहिल्या दोन प्रभागांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रभागाची मतमोजणीला सुरुवात केली जाईल असे महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची मतमोजणीची प्रक्रिया टप्पानिहाय केली जाणार असल्याने मतमोजणीची प्रक्रिया लांबली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीमध्ये एकाच वेळी १४ टेबल ठेवले आहेत.त्यामुळे एकाच वेळी १४ टेबल अशाप्रकारे २८ टेबल ठेवली जाणार आहे. या १४ टेबलांवर एका प्रभागाची आणि दुसऱ्या १४ टेबलावंर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी केली जाणार आहे. या १४ टेबलांमध्ये पार्टीशन टाकून ही मतमोजणी केली जाईल.एका वेळी दोन प्रभागांची मतमोजणी केली जाईल आणि एका प्रभागाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाची मोजणी केली जाईल आणि अशाप्रकारे एका वेळेला दोन प्रभागांमध्ये मतमोजणी केली जाईल,असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले जाईल.
मतदानाच्या दिवशी शेवटच्या वेळी मिळणार टोकन
निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी मतदानाची वेळ आहे. परंतु साडेपाच वाजेपर्यंत जे मतदान केंद्रात पोहोचतील त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी हे टोकन उपलब्ध करून देत त्यांना मतदानाची संधी देणार आहे. टोकन दिल्यानंतर कुणालाही मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मतदान करण्याची वेळेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी मतदान केंद्रात पोहोचल्यास टोकन देत मतदान करण्याची संधी दिली जाणार असल्याने वेळेत मतदान केंद्रात पोहोचणाऱ्या प्रत्येक मतदानाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळणार आहे.