उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने


मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्यावतीने जाहीर करण्यात येणारा वचननामा हा महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्याकामांच्या संदर्भात असणे स्वाभाविक मानले जाते; परंतु २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या उबाठाला आणि २५ वर्षे विरोधी पक्षांत बसणाऱ्या काँग्रेस पक्षाला मुंबई महापालिकाच कळलेलीच नाही. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित कोणतीह कामे येतात आणि कोणती कामे सरकारच्या अखत्यारित येतात याची माहितीच न झाल्याने दोन्ही पक्षांनी आपले वचननामे बनवतानाच महापालिकेशी तीळमात्र संबंध नसलेल्या कामांचा समावेश आपल्या वचननाम्यांमध्ये केल्याचे पाहायला मिळाले आहे.


आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचितने जाहीर केलेला वचननाम्यातील निम्मी आश्वासने ही महापालिकेच्या अखत्यारित येत नसून राज्य सरकारच्या अखत्यारितील दिसून येत आहे. त्यामुळे उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचित हे नक्की महापालिकेची निवडणूक लढवायला चालले आहेत का? की विधानसभेच्या निवडणुकीतून अजून बाहेरच पडलेले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. युती आणि आघाडीने जाहीर केलेल्या वचननाम्यांमध्ये महापालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश असणे स्वाभाविक मानले जाते . परंतु दोन्ही पक्षांनी मांडलेल्या वचननाम्यांमध्ये सरकारच्या मदतीशिवाय आणि परवानगीशिवाय न होणाऱ्या कामांचा तथा सरकारच्यावतीने निर्णयानुसार केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे एकप्रकारे मुंबईकरांची महापालिकेच्या कामांशी संबंध नसतानाही केवळ गाजरे दाखवून फसवणू करण्याचे काम करण्याचा प्रयत्न युती आणि आघाडीकडून केले जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.




  • उबाठा आणि मनसेच्या वचननाम्यातील या आश्वासनांचाा महापालिकेशी काय संबंध?

  • घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये स्वाभिमान निधी देणार.

  • कष्टकरी मुंबईकरांसाठी दहा रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी माँसाहेब किचन्स सुरू करणार.

  • १ लाख तरुण तरुणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी देणार.

  • २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार.

  • महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सी.डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार.

  • दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार.

  • मुंबई महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील ग्रंथालय उभारलं जाईल.


काँग्रेस आणि वंचितचा जाहीरनाम्याचा पालिकेशी काय संबंध?




  •  नवीन, आधुनिक बाजारपेठांची उभारणी करणार

  •  क्लस्टर पुनर्विकासासाठी ४ हजार चौरस मीटर ऐवजी ३ हजारचा पर्याय देणार

  •  कोळीवाडा व गावठाणांसाठी विशेष विकास धोरण आखणार

  •  मुंबईत अधिक अंगणवाड्या सुरू करणार

  •  औद्योगिक व व्यावसायिक धूर नियंत्रण करणार

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य