धनुष्यबाण आणि मशालीमध्ये रंगणार लढत
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : प्रभाग एक. . . घर एक…. कुटुंब एक…. पक्ष वेगळे… चिन्ह वेगळे … ,एकाच घरात राहणारी सख्खी काकी आणि पुतणी निवडणुकीच्या या रणांगणात एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. मालाडमधील प्रभाग क्रमांक ३२ मधून भंडारी कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर एक आणि उबाठाच्या मशाल चिन्हावर दुसरी. दोन्ही पक्ष प्रतिस्पर्धी असून एकाच घरात राहून हे सख्खे नातेवाईक असणारे हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे यांच्यातील कुणीही जिंकले तरी भंडारी कुटुंबातच नगरसेवक निवडून आणण्याचा हा प्रयत्न असून यासाठी सख्खी काकी आणि पुतणी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून काँग्रेसशी भिडताना दिसत आहे.
मुंबईतील मालाडमधील प्रभाग क्रमांक ३२मधून उबाठाच्यावतीने माजी नगरसेविका गीता किरण भंडारी तर शिवसेनेच्यावतीने मनाली अजित भंडारी या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर काँग्रेसच्यावतीने सिरीना केणी या निवडणूक लढवत आहे. माजी नगरसेविक गीता भंडारी यांची मनाली ही सख्खी पुतणी असून दोन्ही गीता भंडारी यांचे पती किरण आणि मनाली यांचे वडिल अजित हे एकाच घरात राहत आहेत. मात्र, एकाच घरात राहून दोन वेगवेगळ्या पक्षाच्यावतीने ते निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एकाच घरात राहून मशाल आणि धनुष्यबाणाची वरचढ त्यांच्यात सुरु आहे. त्यामुळे मशाल जिंकते की धनुष्यबाण याची चर्चा काँग्रेसच्या हातापेक्षा अधिक असून कोणीही जिंकले तरी भंडारी कुटुंबातील नगरसेवक असेल हे मात्र नक्की असेल असे लोकांचे म्हणणे आहे.