सोन्याच्या किंमतीत एक दिवसात प्रति तोळा १३१० रुपयांनी वाढ 'या' जागतिक कारणांमुळे!

मोहित सोमण: पुन्हा एकदा शेअर बाजार, भांडवली बाजारातील अस्थिरतेचा लाभ सोन्याच्या किंमतीत झाला आहे. कारण आज डॉलर निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे आज सोन्याला अस्थिरतेत आधार मिळाला व सोने रिबाऊंड होत महागले. दोन दिवस घसरलेले सोने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने उसळले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३१ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२० रुपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३९३१ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२७७० रुपयांवर, १८ कॅरेटसाठी १०४४८ रूपयांवर पोहोचले आहेत. तर प्रति तोळा दर २४ कॅरेटमागे १३१० रुपये, २२ कॅरेटमागे १२०० रुपये, १८ कॅरेटमागे ९८० रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी आज १२९३१० रूपयावर, २२ कॅरेटसाठी १२७७०० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०४४८० रूपयांवर पोहोचले आहेत.


मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३९६४ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२७७० रुपयांवर, १८ कॅरेटसाठी १०४४८ रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांक संध्याकाळपर्यंत ०.४४% वाढत दरपातळी १३८३४७ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर आज सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ दिवसभरात झाली. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४७% वाढ झाल्याने दरपातळी ४४८१.३१ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. युएस बाजारात आता नवी पेरोल रोजगार आकडेवारी अपेक्षित असताना दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादानंतर कमोडिटी बाजारातही अस्थिरता आहे. दरम्यान आता युएस बाजारात आज अतिरिक्त शुल्कावरील निकालावर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाल्याने, या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करणे पसंत केले. त्यामुळे गोल्ड स्पॉट गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने मागणीपेक्षा पुरवठा घटला. दुसरीकडे ईपीएफ गुंतवणूकीत वाढ होत असताना डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोन्यातील दबाव आणखी वाढला. भारतीय कमोडिटी बाजारातही डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण झाल्याने त्याचा आणखी विपरित परिणाम झाला. आगामी काळात युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती यामुळे सोन्यातील गुंतवणूकीत आणखी वाढ अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांकडून हेजिंग वाढल्याने त्याचा फायदा सोन्यात होत असला तरी सोन्याच्या किंमतीतही अस्थिरता (Volatility) वाढली आहे.


आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर व भविष्यातील सोन्याच्या मार्गक्रमणावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कालच्या घसरणीनंतर सोन्याच्या व्यापारात किंचित सकारात्मकता दिसून आली, कॉमेक्स सोन्याला ४४५० डॉलरच्या पातळीजवळ आधार मिळाल्याने आणि ते ४४७५ डॉलरच्या क्षेत्राकडे वर गेल्याने एमसीएक्स (MCX) सोन्याच्या दरात सुमारे ६५० रूपयांची वाढ झाली. खालच्या पातळीवर खरेदीच्या आवडीमुळे किमती स्थिर होण्यास मदत झाली, तरीही बाजारातील अस्थिरता कायम आहे. नजीकच्या काळात, जागतिक संकेत आणि आगामी अमेरिकन आकडेवारी बाजारातील भावनांना दिशा देत असल्याने, एमसीएक्स (MCX) सोने १३६५०० ते १३९००० रूपयांच्या अस्थिर मर्यादेत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.'

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय