मालमत्तांची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विद्यमान खासदार,आमदार आणि माजी आमदारांच्या पत्नी, पुत्र तसेच काका आत्या निवडणूक रिंगणात उतरले असून यासर्वांच्या मालमत्तांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे समोर आली आहे. अनेक आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांची मालमत्ता कोट्यवधींच्या घरांमध्ये पोहोचली असून आताच हे भावी नगरसेवक कोट्यधीश असल्याचे दिसून आले आहे.
उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू, शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दिप्ती, विद्यमान राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांची कन्या प्रज्योती, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय, शिवसेना आमदार दिलीपमामा लांडे यांची पत्नी शैला, उबाठाचे आमदार मनोज जामसूतकर यांची पत्नी सोनम, विद्यमान आमदार अस्लम शेख यांचे पुत्र हैदर अली आणि बहिण कमरजहाँ सिद्दीकी, माजी आमदार नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहिण कमरजहाँ सिद्दीकी, माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान आणि मुलगी प्रिया आदी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यासर्वांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यामाध्यमातून त्यांची मालमत्ता समोर आली आहे.
उमेदवार : अंकित प्रभू उबाठा (प्रभाग क्रमांक ५४)
व्यवसाय : नोकरी, कमिशन व्यवसाय
सन २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : २ कोटी ५९ लाख रुपये
उमेदवार : प्रज्योती चंद्रकांत हंडोरे -काँग्रेस (प्रभाग क्रमांक १४०)
व्यवसाय : व्यवसाय
सन २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : २० लाख रुपये
उमेदवार : जय मंगेश कुडाळकर, शिवसेना (प्रभाग क्रमांक १६९)
व्यवसाय : संचालक, खासगी नोकरी
सन २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : २ कोटी ५४ लाख
उमेदवार : शैला दिलीप लांडे, शिवसेना, (प्रभाग क्रमांक १६३)
व्यवसाय : व्यवसाय
सन २०२५पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : १ कोटी ५७ लाख ५५ हजार
सन २००७ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्त : १४ लाख २७ हजार रुपये
उमेदवार : सोनम जामसूतकर, उबाठा (प्रभाग क्रमांक २१०)
व्यवसाय : व्यवसाय
सन २०२५पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : १४ कोटी ३८ लाख रुपये
सन २००७ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्त :०७ कोटी ०८ लाख रुपये