एक सत्रात ३.३३% चांदी कोसळली तिसऱ्या दिवशीही नफा बुकिंग सुरूच तरी विक्रमी पातळीवरच का? कारण वाचा

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत सलग तिसऱ्या दिवशी चांदीत नफा बुकिंग सुरूच आहे असे दिसते. आज सत्राच्या सुरुवातीला चांदीत १% पेक्षा अधिक वाढ एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) कमोडिटी बाजारात झाली असताना पुन्हा एकदा आगामी युएस आकडेवारीसह आजच्या ट्रम्प यांच्या टॅरिफ निकालावर साशंकता कायम असताना गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीत सावधगिरी बाळगली असल्याने पुन्हा एकदा चांदीत घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ३ रूपयांनी घसरण झाली असून प्रति किलो दरात ३००० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४९ रुपये, प्रति किलो दर २४९००० रुपयांवर पोहोचले आहेत.तरीही चांदी विक्रमी स्तरावर कायम आहे.


तसेच मुंबईसह प्रमुख शहरातील प्रति १० ग्रॅम चांदीचे दर २४९० रुपये, प्रति किलो २४९००० रूपयांवर पोहोचले आहेत. कमोडिटी बाजारात चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४५% वाढ झाली असून दरपातळी २४६८६५ रूपयांवर पोहोचले आहेत. एकूणच दिवसभरात कमोडिटी बाजारातील चांदी ३% पर्यंत इंट्राडे उच्चांकावर उसळली होती. जागतिक स्तरावरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ३.२०% वाढ झाल्याने दरपातळी ७७.५७ औंस प्रति डॉलरवर गेली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये चांदी १७०% अधिक उसळली होती. त्यामुळे या अस्थिरतेचा चांदीला फायदाही झाला आहे.


काल चांदीच्या निर्देशांकात पुर्नसंतुलन (Rebalancing) केल्याने व जागतिक अस्थिरतेसह मागणी घसरल्याने झाले होते. काल डॉलरमध्ये वाढ झाली असल्याचा दबाव चांदीत निर्माण झाला होता. तसेच आजही डॉलरच्या निर्देशांकात घसरण कायम राहिल्याने चांदीच्या दरात दबाव कायम होता. तत्पूर्वी आज युएस फेडरल न्यायालयाकडून युएस टॅरिफ प्रकरणात निकाल देण्यात येईल तत्पूर्वी गुंतवणूकदारांनी नवी खरेदी करण्यास थांबविल्याने व अस्थिरतेच्या काळात औद्योगिक मागणीत मर्यादा आल्याने चांदी आज स्वस्त झाली आहे.


चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असताना आज दिवसभरात ती ३.२२% घसरली आहे.२४३३२४ रूपयावर चांदी सकाळी स्थिरावली होती ती अखेरच्या सत्रात २४६८५५ रूपयांवर अस्थिरतेमुळे पुन्हा उसळली. तत्पूर्वी तज्ञांच्या मते, व्यापारी वार्षिक कमोडिटी इंडेक्सच्या पुनर्संतुलनापूर्वी आपली स्थिती निश्चित करत होते ज्यामुळे फ्युचर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते चांदी अधिक असुरक्षित आहे कारण अंदाजानुसार,पुनर्संतुलन प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे ६.८ अब्ज डॉलर्स किमतीचे चांदीचे फ्युचर्स (जे COMEX ओपन इंटरेस्टच्या सुमारे १२% आहे) विकले जाऊ शकतात. तज्ञांच्या मते, मजबूत झालेल्या अमेरिकन डॉलरमुळे अतिरिक्त दबाव आला तर अमेरिकेच्या संमिश्र आर्थिक आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक मार्गाबद्दल फारशी स्पष्टता मिळाली नाही. तरीही बाजारपेठा वर्षाच्या उत्तरार्धात व्याजदर कपातीची शक्यता गृहीत धरत आहेत ज्यामुळे ही अस्थिरता कायम राहू शकते.


तरीही चांदी विक्रमी स्तरावर कायम आहे. भौतिक उपलब्धतेची कमतरता आणि सततच्या गुंतवणुकीच्या आवडीचा आधार सिल्वर स्पॉट अथवा ईपीएफ गुंतवणूकीत मिळत आहेत. व्हेनेझुएलामधील घडामोडी आणि पूर्व आशियातील वाढता तणाव यासह भूराजकीय अनिश्चितता, सुरक्षित गुंतवणुकीची मागणी टिकवून चांदीची एकूणच मागणी ठेवण्यास मदत करत आहेत. तज्ञांच्या मते पुरवठ्याच्या बाजूने मर्यादा स्पष्टपणे दिसत आहेत,कारण मोठ्या निर्यातीनंतर चीनमधील चांदीचा साठा जवळपास एका दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

उद्धव - राजच्या शिवाजी पार्कमधील सभेआधीच उबाठाला मोठा धक्का

मुंबई : उद्धव आणि राज यांची रविवारी शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा होणार आहे. ही सभा होण्याआधीच उबाठाला मोठा

काँग्रेसचा 'लाडकी बहीण' द्वेषाचा क्रूर चेहरा उघड!

मुंबई : "महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनात ठासून भरला आहे. आमच्या माता-भगिनींच्या

'धारावीचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'

कुंभारवाड्यासह सर्व कुटीर उद्योगांना पाच वर्षे असेल कर माफ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला

टपाली मतदानासाची सुविधा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात

मतदान केंद्रांवरील मुलभूत सुविधा आणि मनुष्यबळांची जबाबदारी उपायुक्त, सहायक आयुक्तांवर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

लोकशाहीच्या उत्सवासाठी १५ जानेवारीला सुट्टी

कर्मचाऱ्यांना सुट्टी तथा सवलत न देणाऱ्यांवर होणार कारवाई तपासणीसाठी महापालिकेच्यावतीने दक्षता पथकाची

Bangladesh News : बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, तरुणाला बेदम मारहाण आणि विषबाधा; अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याचे