जेएसडब्लू स्टील तिमाही उत्पादन आकडेवारीनंतर शेअर्समध्ये १% वाढ

मोहित सोमण: जेएसडब्लू स्टील (JSW Steel Limited) कंपनीच्या तिमाही निकालातीव उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १% वाढ झाली आहे. खरं तर कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY26) इयर ऑन इयर बेसिसवर ६% वाढ झाली असली तरी तिमाही बेसिसवर कंपनीच्या उत्पादनात (Production) -५% घसरण झाली आहे तरीही गुंतवणूकदारांनी आज सकारात्मक प्रतिसाद शेअरला दिला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील एकूण उत्पादन (Consolidated Production) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७.०३ मिलियन टन (Million Tons Mnt) वरून या तिमाहीत ७.४८ मिलियन टनवर वाढ झाली आहे. तर गेल्या तिमाहीतील ७.९० वरून या तिमाहीत ७.४८ मिलियन टनवर घसरण झाली आहे.


तर एकूण नऊ महिन्यांच्या आधारावर एकत्रित उत्पन्नात गेल्या तिमाहीतील २०.१६ तुलनेत २२.६५ मिलियन टनवर वाढ झाली असल्याने इयर ऑन इयर बेसिसवर १२% वाढ नोंदवली आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतीय उत्पादनात गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ६.८२ तुलनेत या तिमाहीत (Q3FY26) ७.२८ मिलियन टनवर वाढ झाली आहे मात्र तिमाही बेसिसवर दुसऱ्या तिमाहीतील (Q2FY26) मधील ७.६६ तुलनेत या तिमाहीत ७.२८ मिलियन टनवर घसरण झाली आहे. मात्र नऊ महिन्यांच्या आधारावर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १९.५८ तुलनेत या नऊमाहीत (9M FY26) इयर ऑन इयर बेसिसवर २१.९७ मिलियन टन (१२%) वाढ झाली आहे.


आपल्या उत्पादनाबाबत माहिती देताना कंपनीने विजयनगर येथील ब्लास्ट फर्नेस ३ (BF3) सप्टेंबर २०२५ च्या अखेरीपासून क्षमता वाढीसाठी बंद ठेवण्यात आले आहे आणि ते आर्थिक वर्ष २६ च्या चौथ्या तिमाहीच्या अखेरीस पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, याचा आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत भारतीय कामकाजाच्या क्षमता वापरांवर परिणाम झाला. BF3 ची क्षमता वगळून या तिमाहीसाठी भारतीय कामकाजाचा क्षमता वापर सुमारे ९३% होता आणि BF3 ची क्षमता समाविष्ट केल्यास तो ८५% होता.' असे म्हटले आहे.


जेएसडब्लू स्टील ही जेएसडब्लू समुहाची स्टील कंपनी म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. गेल्या तीन दशकांत, जेएसडब्ल्यू स्टील एकाच उत्पादन युनिटपासून वाढून भारताची एक अग्रगण्य एकात्मिक पोलाद कंपनी बनली आहे, ज्याची एकत्रित कच्च्या पोलाद उत्पादन क्षमता ३५.७ दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) आहे, ज्यात अमेरिकेतील १.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा समावेश आहे. देशांतर्गत कच्च्या पोलाद उत्पादन क्षमता ३४.२ दशलक्ष टन प्रतिवर्ष आहे. तिच्या वाढीच्या पुढील टप्प्यात, पुढील तीन वर्षांत एकत्रित क्षमता ४३.४ दशलक्ष टन प्रतिवर्षपर्यंत पोहोचेल असा कंपनीचा अंदाज आहे. कंपनीचा कर्नाटक राज्यातील विजयनगर येथील प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा एकाच ठिकाणी असलेला पोलाद उत्पादन प्रकल्प म्हणून ओळखला जातो ज्याची सध्याची क्षमता १७.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष आहे. सकाळी १०.१० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.४८% वाढ झाली आहे त्यामुळे कंपनीच्या शेअर ११६१.४० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. आतापर्यंत कंपनीच्या शेअरने आज इंट्राडे उच्चांक ११६३.९० रूपयांवर नोंदवला असून गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये १.९५% घसरण झाली असून गेल्या महिनाभरात शेअर ४.४८% उसळला होता. संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३०.३६% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये मात्र ०.४०% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

'मुंबईत फक्त जय श्रीराम म्हणणारेच निवडून द्यायचे'

मुंबई : मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून

मुंबईत परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ?

मुंबई : परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ? हे मुंबईकरांना व्यवस्थित माहिती आहे. मुंबईत मेट्रो आणि

पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या, ट्रम्पनी दिली मोठी ऑफर

वॉशिंग्टन डीसी : कायम हिमाच्छादित असलेल्या ग्रीनलँड द्वीप समुहाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग

लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील चौघांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित

नवी दिल्ली : दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव,

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या