‘मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास जमला नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टीका


नागपूर : "मी नगरसेवक होईल किंवा राजकारणात इतका पुढे जाईन, असे कधीच वाटले नव्हते; पण नागपूरकरांच्या आशीर्वादामुळे मी आमदार आणि मुख्यमंत्री कधी झालो हे समजलेही नाही. आज जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले, ते शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आता काय विकास करणार?" अशा बोचऱ्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरच्या विकासाचे मॉडेल आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर भाष्य केले.


राज ठाकरे यांच्या एका विधानाचा संदर्भ देत फडणवीस मिश्किलपणे म्हणाले की, "राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरच ठरवल्यामुळे मी आता अधिकृतपणे 'सर्टिफाईड नागपूरकर' झालो आहे." आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये सर्वाधिक नाव नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. त्यांनी ५५ ब्रिज तयार केले. मुंबई पुण्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचा नागपुर शहर आहे. या शहरात भरपूर आधुनिकता आहे. नागपुरात सांडपाणी प्रक्रिया होते यामध्ये सांडपाणी मध्ये प्रक्रिया करून निर्मिती करून पैसा गमावणारा पहिला शहर झाले.चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचं मॉडेल नागपुर मध्ये तयार केले जात आहे. आजही येथे पाण्यासाठी मोर्चे
निघत नाही.


दीक्षा भूमी होणार आंतरराष्ट्रीय स्थळ


नागपूर शहराची आळेख दीक्षाभूमीचे शहर अशीही आहे. हे स्थान पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे. १९९७ मध्ये मी महापौर असताना आणि नितीन गडकरी पालकमंत्री असताना दीक्षाभूमी येथील पाण्याची व अन्य गोष्टी केल्या. आता देखील २०० कोटी रुपये खर्चून दीक्षा भूमी आंतरराष्ट्रीय स्थळ व्हावे असं काम सुरू आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. मला किंवा नितीन गडकरी यांना संधी मिळाली, तेव्हा आम्ही नागपूरला डोळ्यासमोर ठेवले हे खरे आहे, पण इतर शहरांकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबईचे बदललेले स्वरूप असो किंवा पुणे आणि संभाजीनगरचा विकास, हे सर्व आमच्या काळातच झाले. समृद्धी महामार्गाचा फायदा केवळ नागपूरला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील व्यवसायांना होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

RR vs MI : राजस्थानचा 'रॉयल' धमाका! मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप!

गुवाहाटी : आयपीएलच्या १९ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि

Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade)

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी