'जय श्री राम'चा घोष करणाराच महापौर असणार

विरार: हिंदुत्ववादी विचार असणारे खासदार आणि दोन्ही आमदार वसई-विरारमध्ये निवडून आणले आहेत. महापौर सुद्धा येथे हिंदुत्ववादी विचाराचाच बसवायचा आहे. त्यामुळे जय श्री रामचा नारा देणारा महापौर वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात असेल असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. वसई-विरार महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप सर्व प्रकारे व्युहरचना करीत आहे. आमदार राजन नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची जबाबदारी दिल्यानंतर, त्यात आणखी भर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांच्याकडेही महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे हे मंगळवारी वसई विरारमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नालासोपारा येथील गालानगर, विरारमधील कारगीलनगर, फुलपाडा आणि कोकण नगर अशा विविध ठिकाणी रोड शो आणि चौक सभा घेतल्या. तसेच निवडणुकीबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वसई-विरार शहरात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तर गेल्या काही काळात येथील लोकवस्तीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यांना सुविधा देण्यासाठी आमचे आमदार आणि खासदार सक्षम आहेत. असे राणे यांनी सांगितले. महापालिकेत जर आमची सत्ता आली. तर, ज्या अठरा प्रकारच्या नागरी सुविधा येथील महापालिकेने रहिवाशांना पुरवायला हव्यात त्या येथे अवैध पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशींना न देता, येथील हिंदू समाजातील स्थानिकांना देण्याची आमची भूमिका असेल, असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आमचे आहेत. त्यामुळे विकासाचा अजेंडा आणि निधी आमच्याकडे आहे. इतरांकडे फक्त खाली डब्बा आहे. निधीची ताकद आमच्याकडे असल्यामुळे विकासकामे आम्हीच करू शकतो. त्यामुळे भाजपला मतदान म्हणजे विकासाला मतदान. महायुतीला मतदान म्हणजे सुरक्षेला मतदान, असे मतही राणे यांनी व्यक्त केले आहे.

पाकचा जयघोष करणाऱ्याला पोलिसांनी हिसका दाखविला

वसईत एका केशकर्तनालयात पाकिस्तानी जयघोषाचे गाणे वाजविल्याचा प्रकार घडला होता. त्यावर बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, त्या नालायकास पोलिसांनी हिसका दाखविला आहे. काश्मीर बनेगा पाकिस्तान अशी गाणी वाजवून जर यांना वाटत असेल की, हे आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवू शकतात. तर त्यांना विसर पडला आहे की, राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे आणि जर कुणी अशी गाणी वाजवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, असा इशारा सुद्धा राणे यांनी दिला आहे. शहरातील वाढत्या बांगलादेशींवर आमची करडी नजर आहे. त्यांना शहरातून हद्दपार करण्यासाठी महापालिकेत आमची सत्ता येणे गरजेचे आहे, असे मत सुद्धा मंत्री राणे यांनी यावेळी व्यक्त केले. तर महाराष्ट्रातील वाढत्या लव जिहाद प्रकरणांना आळा घालण्यासाठी गुलव जिहाद कायदाही महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट
Comments
Add Comment

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६