उल्हासनगरात शिवसेना-भाजप आमने-सामने

उल्हासनगर : निवडणूकपूर्व युतीचा गाजावाजा, मंचावर दोस्तीचे फोटो आणि भाषणांत एकजुटीचे आश्वासन; मात्र प्रत्यक्ष निवडणूक मैदानात चित्र मात्र पूर्णपणे वेगळे दिसू लागले आहे. 'दोस्ती का गठबंधन' म्हणत जाहीर करण्यात आलेली शिंदेंची शिवसेना, कलानी गट आणि साई पक्षाची युती उल्हासनगरात प्रभाग पातळीवरच कोलमडताना दिसत आहे. दोन प्रभागांत युतीतील पक्षांचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्याने युतीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), कलानी गट आणि साई पक्ष यांनी एकत्र येत 'दोस्ती का गठबंधन' जाहीर केले होते. शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ९ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढणारे कलानी गटाचे उमेदवार आणि दूरदर्शन संच चिन्हावर लढणारे साई पक्षाचे उमेदवार एकाच प्रभागात रिंगणात उतरल्याने 'युती नेमकी आहे तरी कुणाची?' असा प्रश्न मतदार विचारू लागले आहेत.


समन्वयाचा अभाव


यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पुन्हा आमने-सामने उभे ठाकले असले, तरी यावेळी शिवसेनेला गेल्या निवडणुकीत भाजपसोबत असलेले साई पक्ष आणि कलानी गट यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे लढत वेगळी आणि अधिक रंगतदार ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र युतीतील समन्वयाच्या अभावामुळे ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची २४ तासांत भाजपमध्ये घरवापसी

मीरा-भाईंदर : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या मीरा रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी

कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून

राबोडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने

जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारावेळी अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी

कुणाच्याही भूलथापांना, दबावाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही.