पुणे : हल्ली चोरीचे प्रकरण वाढत आहे त्यातच नवीन प्रकरण असं की बॅायफ्रेंडकडे घर भाड ३० हजार भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणुन प्रेयसीनेच आपल्या स्वताच्या काकाच्या घरावर चोरी करायचा प्लॅन केला..पण पोलीसांनी प्रियकरासह व दोन साथीदार तरुणांना अटक केली आहे.. यश मोहन कुऱ्हाडे, (वय २०), ऋषभ प्रदीप सिंह (वय २१) आणि राज विवेक भैरामडगीकर (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली.
घटना कल्याणीनगरमधील तक्रारदाराच्या बंगल्यात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दोन अनोळखी व्यक्ती चाकू आणि दोरी घेऊन बंगल्यात शिरल्याने घरातील महिला घाबरल्या; मात्र, त्यांनी जोरात आरडाओरडा केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला आणि आरोपी पळून गेले.
पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, कुऱ्हाडे आणि त्याचा मित्र या प्रेयसीच्या कटानुसार दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात आले होते. आरोपीकडे घराचे दार उघडे ठेवलेले होते, त्यामुळे आरोपी सहज घरात शिरू शकले. कुऱ्हाडे बारावी नापास असून, ऋषभ मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि भैरामडगीकर हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.चौकशीत समोर आले की, कुऱ्हाडे आणि प्रेयसी यांच्यात प्रेमसंबंध असून घरभाड्याच्या तंगीमुळे प्रेयसीनेच हा कट रचला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आणि आवश्यक ती कारवाई करण्यास सज्ज आहेत.