अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेतील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी आज नवी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, संजीव नाईक ,दीपेश म्हात्रे आदी मान्यवरांच्या उपस्तीथत हा प्रवेश झाला. एकाच वेळी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपाची राजकीय स्थिती अतिशय मजबूत झाली आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची यादी
१)प्रदीप नाना पाटील
२) दर्शना उमेश पाटील
३) अर्चना चरण पाटील
४) हर्षदा पंकज पाटील
५) तेजस्विनी मिलिंद पाटील
६) विपुल प्रदीप पाटील
७) मनीष म्हात्रे
८) धनलक्ष्मी जयशंकर
९) संजवणी राहुल देवडे
१०) दिनेश गायकवाड
११) किरण बद्रीनाथ राठोड
१२) कबीर नरेश गायकवाड
काँग्रेसच्या या १२ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकारणाची दिशा बदलणार आहे. ज्या नगरसेवकांनी विरोधात निवडणूक लढवली, तेच आता भाजपच्या झेंड्याखाली येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आता स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद किती उरणार आणि भाजपला या नगरसेवकांच्या प्रवेशाने किती फायदा होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.