ट्रम्प यांच्या संकेतानंतर शेअर बाजारात घसरण कायम! सेन्सेक्स ४७.०७ अंकाने व निफ्टी १२.५० अंकांने कोसळला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ घसरण कायम राहिली आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील प्रकरणानंतर आता सकाळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील नव्या शुल्काच्या घडामोडीवर गुंतवणूकदार अस्वस्थ असल्याने आणखी अस्थिरता निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह युएस नवीन कमकुवत एडीपी आकडेवारीचा परिणाम आशियाई बाजारासह भारतीय बाजारात दिसू शकतो. सेन्सेक्स ४७.०७ अंकाने व निफ्टी १२.५० अंकांने घसरला आहे. पहाटे गिफ्ट निफ्टीत घसरणीनंतर घसरणीचा ट्रेंड स्पष्ट झाला असताना आजही बाजारातील सेल ऑफ व नफा बुकिंग कायम राहते का हे पहावे लागेल. दरम्यान सकाळच्या सत्रात गेले दोन दिवस रूपयातील वाढलेली पातळी परदेशी गुंतवणूकदारांची विक्री नियंत्रित करेल का यावरही बाजाराचे भविष्य अवलंबून आहे. सकाळी बँक निर्देशांकातही घसरणीचा ट्रेंड असल्याने टेक्निकल पोझिशन चांगली असतानाही घसरण झाली आहे. ज्यामुळे बाजारात आज सपोर्ट लेवल मिळाली नाही. गेले कित्येक दिवस तेजीत असलेला मेटल निर्देशांकात आज घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. सकाळच्या सत्रात वाढ रिअल्टी, कंज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकात झाली असून इतर सर्व निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळी सर्वाधिक घसरण मेटल, तेल व गॅस, ऑटो निर्देशांकात दिसत आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ग्राविटा इंडिया (४.२३%), वारी एनर्जीज (२.८८%), होम फर्स्ट फायनान्स (२.४७%), पीटीसी इंडस्ट्रीज (२.०८%),आयनॉक्स इंडिया (१.६०%), एंजल वन (१.५९%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण टीमकेन इंडिया (५.१७%), झेडएफ कमर्शियल (३.७२%), टोरंट पॉवर (३.३२%),एनएमडीसी स्टील (३.२६%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (१.९१%), टीबीओ टेक (१.५५%), भेल (१.५०%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील सकाळच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे हेड ऑफ प्राईम रिसर्च देवार्ष वकील म्हणाले आहेत की,'डाऊ आणि एस अँड पी ५०० मध्ये घसरण, पण नॅसडॅक किरकोळ वाढला. भूराजकीय घडामोडी, सर्वोच्च न्यायालयाचे आगामी शुल्कविषयक निर्णय आणि चौथ्या तिमाहीच्या कमाईच्या हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यामुळे अमेरिकन बाजार सावध भूमिकेत आहेत.


बुधवारी दिवसभर अमेरिकन शेअर्समध्ये चढ-उतार दिसून आले आणि तुलनेने निरुत्साही सत्राची सांगता संमिश्र पातळीवर झाली.ट्रम्प यांनी व्हेनेझुएला अमेरिकेला बाजारभावाने ५० दशलक्ष बॅरलपर्यंत तेल पुरवेल अशी घोषणा केल्यानंतर तेलाच्या किमती घसरल्याने ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एक्सॉन मोबिल ३% आणि शेवरॉन ४% ने घसरले.सत्रादरम्यान गृहनिर्माण क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे फिलाडेल्फिया गृहनिर्माण क्षेत्र निर्देशांक २.६ टक्क्यांनी खाली आला.कालच्या प्रचंड वाढीनंतर सेमीकंडक्टर कंपन्यांचे शेअर्स स्थिर झाले, तर एआय-अनुकूलित स्टोरेजमधील प्रगतीनंतर सॅनडिस्कचा शेअर जवळपास २८% वाढला.कमोडिटी निर्देशांकाच्या पुनर्संतुलनापूर्वी मौल्यवान धातूंमध्ये नफावसुली झाली.


एडीपीच्या डिसेंबरच्या रोजगार डेटानुसार ४१००० नवीन नोकऱ्यांची भर पडली, जी अपेक्षेपेक्षा किंचित कमी होती.अर्थशास्त्रज्ञांनी खाजगी क्षेत्रातील रोजगारात ४७००० नोकऱ्यांची वाढ अपेक्षित होती, तर मागील महिन्यात ३२००० नोकऱ्या कमी झाल्याचे सुरुवातीला नोंदवले गेले होते.आशियाई इक्विटी बाजारांमध्ये संमिश्र कामगिरी दिसून आली, सावध वातावरणामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये माफक घसरण झाली. जपानचा निक्केई २२५ १% ने घसरला.


निफ्टीने काल सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवली, ३७ अंकांनी घसरून २६१४० पातळीवर स्थिरावला, परंतु दिवसाच्या नीचांकी पातळीपेक्षा वर बंद होण्यात तो यशस्वी झाला. अल्पावधीतील या नरमाईनंतरही,दैनंदिन आलेखांवरील उच्चांक आणि नीचांकांच्या पॅटर्नमुळे व्यापक स्थितीगत कल तेजीचाच राहिला आहे.वरच्या बाजूला (Upside), २६३७३ येथील अलीकडील उच्चांक तात्काळ प्रतिकार पातळी (Immidiate Resistance Level) म्हणून काम करण्याची शक्यता आहे, तर २६००० ची पातळी नजीकच्या काळात मजबूत आधार (Strong Support) देईल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

'मुंबईत फक्त जय श्रीराम म्हणणारेच निवडून द्यायचे'

मुंबई : मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून

मुंबईत परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ?

मुंबई : परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ? हे मुंबईकरांना व्यवस्थित माहिती आहे. मुंबईत मेट्रो आणि

पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या, ट्रम्पनी दिली मोठी ऑफर

वॉशिंग्टन डीसी : कायम हिमाच्छादित असलेल्या ग्रीनलँड द्वीप समुहाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग

लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील चौघांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित

नवी दिल्ली : दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव,

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या