चीन, इराण, रशिया आणि क्युबाशी आर्थिक संबंध तोडा : अन्यथा… तेल उपशावर बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाला नवा इशारा


वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉर्डिग्ज यांच्या नेतृत्वाखालील नवीन राजवटीने चीन, रशिया, इराण आणि क्युबाशी आर्थिक संबंध तोडले तरच अधिक तेल पंप करण्याची परवानगी दिली जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.


गेल्या आठवड्यात अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना यावेळी पकडण्यात आले. तेव्हाच डेल्सी रॉर्डिग्ज यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. बाजारभावानुसार व्हेनेझुएलाने अमेरिकेला तेल विकण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाच्या नवीन नेतृत्त्वाला सांगितले की, जर त्यांनी त्यांच्या अटींचे पालन केले तरच त्यांना त्यांच्या स्वतःच्या साठ्यातून अधिक तेल काढण्याची परवानगी दिली
जाऊ शकते.


चीन, रशिया, इराण व क्युबा या देशांशी व्हेनेझुएलाने आर्थिक संबंध तोडावेत, व्हेनेझुएलाने केवळ अमेरिकेशी भागीदारी करावी, असे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. चीन हा व्हेनेझुएलाचा सर्वांत मोठा तेल खरेदीदार आहे.

Comments
Add Comment

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

ट्रम्पच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे रखडला अमेरिका - भारत मुक्त व्यापार करार

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे

'ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मिळालेले मोठे यश, पाकिस्तानने युद्धबंदीची केलेली विनंती', स्विस थिंक टँकचा खुलासा

बर्न : सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने ४७ पानांचा अहवाल

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

चीनची लोकसंख्या वर्षभरात ४० लाखांनी घटली; वृद्धांची संख्या वाढली

बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी

पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७