आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर खुल्या जागेवरचा दावा संपुष्टात

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


नवी दिल्ली : आरक्षित सीटवर अर्ज केल्यानंतर आणि लाभ घेतल्यानंतर उमेदवार नंतर जनरल सीटवर दावा करू शकत नाही. जरी त्या उमेदवाराचे मार्क हे जनरल श्रेणीतील विद्यार्थांच्या बरोबरीचे असले तरी त्या विद्यार्थ्याला ओपन सीटवर दावा करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या पात्रतेबाबत बुधवारी निर्णय दिला आहे.


देशात मागास आणि अनुसूचित जातींसाठी तयार करण्यात आलेल्या आरक्षण धोरण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी मिळणाऱ्या सवलतींबाबत न्यायालयाने हा निर्णय दिला. जो विद्यार्थी आरक्षित श्रेणीमधून सुरुवातीच्या परीक्षा, प्रिलिम्समध्ये आरक्षण नियमानुसार मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेतो त्याला याच आरक्षित श्रेणीअंतर्गत पुढे देखील राहावे लागणार आहे. जर या उमेदवाराने अंतिम परीक्षेत चांगले मार्क मिळवले. त्या आधारे तो ओपन सीटवर दावा करू शकत नाही. त्याला सुरुवातीच्या परीक्षा ज्या आरक्षित श्रेणीतून दिल्या होत्या, त्याच श्रेणीत रहावे लागणार आहे.


कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द : जस्टिस जेके माहेश्वरी आणि जस्टिस विजय बिश्नोई यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारची याचिका स्वीकारत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. कर्नाटक उच्च न्यायालयानं अनुसूचित जातीच्या एका उमेदवाराला ओपन श्रेणीमधून नियुक्ती देण्यास परवानगी दिली होती. त्या उमेदवाराला अंतिम परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये ओपन उमेदवारापेक्षा चांगले गुण मिळाले होते.


काय प्रकरण होते?


आरक्षणाचा लाभ घेतलेला उमेदवार जी. किरण यांची अंतिम रँक लिस्टमध्ये १९ व एटनी यांची ३७ वी रँक होती. कॅडर देताना कर्नाटकमध्ये एक ओपन इनसाईडर जागा होती. तिथे कोणतीही एससी इनसाईडर व्हेकन्सी नव्हती. मात्र किरण यांनी चांगल्या रँकमुळे ओपन श्रेणीतील जागेवर दावा केला होता.


पूर्व परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ


न्यायालयाने वन सेवेच्या आरक्षित नसल्या कॅडरमध्ये एका अनुसूचित जाती उमेदवाराला नियुक्ती देण्याच्या मागणीवर विचार करण्यास नकार दिला. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने प्राथमिक परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ घेतला होता.

Comments
Add Comment

सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना