नालासोपाऱ्यात मुख्यमंत्र्यांची उद्या जाहीर सभा

वसई: वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या अानुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्व येथील सेंट्रल पार्क गार्डन येथे जाहीर प्रचारसभा होणार आहे. त्यासाठी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा महामंत्री मनोज बारोट यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यभरात सुरू असलेल्या विकासकामांना सामान्य जनतेने पसंती दिली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. आता वसई-विरारमध्येही विकासाच्या बाजूने नागरिक मतदान करतील. वसई-विरारमध्ये भाजप-शिवसेना-श्रमजीवी, आणि आगरी सेना महायुतीचा निर्विवाद विजय होईल, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील प्रत्येक व्यक्ती मतदान करणार आहे. त्यामुळे मिनी विधानसभा निवडणुकीचा आता दुसरा टप्पा असून, पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. आता २९ महापालिकेतही भाजपला यश मिळेल, असा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला.


निष्ठावान कार्यकर्ते आजही भाजपमध्ये आहेत
आपल्याला किंवा आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळाली नाही. एवढ्या कारणावरून पक्ष बदलणे अशा कार्यकर्त्यांना निष्ठावान म्हणणे योग्य नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. उमेदवारी देताना सर्वच समाधानी असू शकत नाहीत. उमेदवारीसाठी दावेदार असताना, केवळ पक्ष आदेशाचा सन्मान करणारे मनोज बारोट यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते आजही भाजपमध्ये आहेत. असे उत्तर भाजप सोडून गेलेल्या काही पदाधिकाऱ्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत उपाध्ये
यांनी दिले.

Comments
Add Comment

बोटावरची शाई दाखवा अन् सवलतींचा लाभ घ्या

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेची मोहीम विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी

पालघरमध्ये पोलिसांनी गुन्हेगारीचे कंबरडे मोडले

पालघर: गेल्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असून कायदा व सुव्यवस्थेचा

'जय श्री राम'चा घोष करणाराच महापौर असणार

विरार: हिंदुत्ववादी विचार असणारे खासदार आणि दोन्ही आमदार वसई-विरारमध्ये निवडून आणले आहेत. महापौर सुद्धा येथे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

वसई-विरार निवडणूक रिंगणात कोट्यधीश उमेदवार

दोन उमेदवारांकडे अब्जावधींची संपत्ती विरार : वसई-विरार महापालिकेच्या मतदानाची तारीख जवळ जवळ येत असताना,

उत्तम घरत आणि राजेंद्र माच्छींनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार

पालघर : पालघर जिल्ह्याच्या राजकारणात नगर परिषद निवडणुकीनंतरचे नवे पर्व सुरू झाले आहे. पालघर नगर परिषदेच्या