मोहित सोमण: एएमएफआय (Association of Mutual Fund of India AMFI) संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) मार्च महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर २३.११% वाढल्याचे स्पष्ट केले आहे. मार्च २०२४ मधील ५३.४० लाख कोटी रुपये तुलनेत मार्च २०२५ मध्ये ६५.७४ लाख कोटीवर वाढ झाली आहे. त्यामध्ये इक्विटी व डेट या दोन्ही बाजारात वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांची गुंतवणूकीमधील वाढलेला रस पाहता ही वाढ झाल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले. मार्च २०२० मधील २२.२६ लाख कोटी तुलनेत ही वाढ ५ वर्षात ६५.७४ लाख कोटीवर झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. विशेषतः अहवालात म्हटल्याप्रमाणे, निफ्टी ५० टीआरआय (Nifty 50 TRI) व सेन्सेक्स टीआरआय (Sensex TRI) यामध्ये अनुक्रमे गुंतवणूकदारांना ६% व ५.९% परतावा मिळाले असे अहवालाने आपल्या अभ्यासात म्हटले आहे. मार्च २०२५ पर्यंत पोर्टफोलिओतही विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. आकडेवारीनुसार, एकूण पोर्टफोलिओ संख्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३२% वाढली आहे. मार्च २०२४ मध्ये ती १७७८५६७६० होती ती मार्च २०२५ मध्ये २३४५०८०७१ झाली आहे.
अहवालानुसार, केवळ आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ८.१५ लाख कोटींची व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत गुंतवणूक झाली आहे. मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील प्राधान्य व जनजागृती वाढल्याने ही वाढ झाली आहे. इक्विटी योजनेत ४.१७ लाख कोटींची आवक बाजारात झाली.तर इतर हायब्रीड, इन्कम, डेट, पॅसिव्ह अशा इतर प्रकारच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओत वाढ झाली आहे. निरिक्षणानुसार फेब्रुवारी २०२५ मधील ६.२५% पातळीवर दरकपात झाल्यानंतर आणखी आवक गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड एयुएम (Mutual Fund Asset Under Management AUM) व सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) यांच्यातील गुणोत्तर मार्च २०२५ पर्यंत उच्चांकी १९.९% पातळीवर पोहोचले.
क्रिसील इंटेलिजन्स व एएमएफआय यांच्या एकत्रित स्त्रोत आकडेवारीनुसार, सर्वाधिक वाढ इक्विटी/ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत झाली आहे. मार्च २०२० मधील ६२६.९३ लाख तुलनेत मार्च २०२५ पर्यंत ही वाढ १६३८.२५ लाखावर गेली आहे. मात्र क्लोज एंडेड व इंटर्वल योजनेत मार्च २०२० मधील २७.४८ लाखावरून ५.२१ लाखावर घसरण मार्च २०२५ पर्यंत झाली आहे. इतर योजनेतही मार्च २०२० मधील ३१.६० लाखावरून पोर्टफोलिओत मार्च २०२५ पर्यंत ४१४.७२ लाखावर वाढ झाली आहे. हायब्रीड म्युच्युअल फंड योजनेत मार्च २०२० मधील ९५.७३ लाखावरून मार्च २०२५ मधील १५६.६७ लाखावर पोर्टफोलिओत वाढ झाली आहे.
एसआयपीतही वाढ
एसआयपी (Systematic Investment Plan SIP) गुंतवणूकीतही आकडेवारीनुसार वाढ झाली आहे. संपूर्ण २०२५ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ २.८९ लाख कोटीवर झाली आहे. विशेषतः मार्कट टू मार्केट (MTM) बाजारात याचा लाभ झाला असून इयर ऑन इयर बेसिसवर नव्या एसआयपी खात्यात २४.५९% वाढ झाली. एकूण म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणूकीपैकी ही २०.३१% गुंतवणूक आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एकूण नवी एसआयपी खाती ४.२८ कोटी होती ती आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६.८० कोटीवर गेली आहेत.
गुंतवणूकदार शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणुकीचा स्वीकार करत आहेत.अधिक संयमी होत आहेत आणि बाजारातील चढउतारांवर आधारित आवेगपूर्ण निर्णयांना कमी बळी पडत आहेत. म्युच्युअल फंड उद्योग जसजसा विकसित होत आहे असे म्युच्युअल फंड अहवालात मत नोंदवले गेले आहे. तसतसा हा कल सुरू राहण्याची शक्यता आहे ज्यात गुंतवणूकदार अल्प-मुदतीच्या फायद्यांपेक्षा दीर्घ मुदतीच्या परताव्याला प्राधान्य देतील असेही पुढे एसआयपी गुंतवणूकतील वाढीवर संस्थेने म्हटले.
दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारून, गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेवर मात करू शकतात आणि त्यांच्या गुंतवणुकीची पूर्ण क्षमता वापरू शकतात, ज्यामुळे अधिक स्थिर आणि शाश्वत संपत्ती निर्मिती होते. यातील आणखी एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे या दोन्ही शहरांमध्ये असाच कल दिसून येतो, कारण मार्च २०२५ च्या तुलनेत मार्च २०२० पर्यंत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या SIP मालमत्तेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, तर एका वर्षापेक्षा कमी काळ ठेवलेल्या एसआयपी (SIP) मालमत्तेचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, जे दीर्घकालीन संपत्ती निर्मिती धोरणांकडे बदलाचे संकेत देते.
अस्वीकरण: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.