शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रचाराची सुरुवात करताना ‘नवी मुंबई, नवे सरकार’ अशी ठळक घोषणा दिली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) प्रचाराच्या केंद्रस्थानी उमेदवार निवडीत मूळ भाजप इच्छुकांना डावलण्यात आल्याचा मुद्दा आणल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजप–शिंदेसेनेची युती असली, तरी नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या भूमिकेमुळे युती न झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाबाबत झालेल्या चर्चांनंतर नाईक यांच्यामार्फत दिलेला प्रस्ताव शिवसेनेला (शिंदे गट) मान्य न झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे.


भाजपने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पूर्ण अधिकार दिल्याने उमेदवार यादीत नाईक समर्थकांचा भरणा झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे नाराज झालेल्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ‘नवी मुंबई, नवे सरकार’चा नारा देत ‘एकसंध लढूया’ असा संदेश दिला आहे. ही घोषणा संघ परिवाराला दिलेली साद असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले की, ''शिंदेसेनेने संघ परिवाराशी संबंधित उमेदवारांना संधी दिली असून भाजपच्या यादीत अशा उमेदवारांचा अभाव आहे.'' नवी मुंबईत ही लढाई शिवसेना–भाजप युतीची नसून ‘मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही’ अशी असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर शिंदेसेनेचा प्रचारही याच मुद्द्याभोवती केंद्रित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

Thane Metro : वडाळा ते कासारवडवली प्रवास आता सुसाट! मेट्रो ४ मुळे मुंबई-ठाणे येणार अधिक जवळ, मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितला पूर्ण 'प्लॅन'

ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईन ४

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत.

उल्हासनगरमध्ये २० प्रभाग; ७८ जागांसाठी ४३२ उमेदवारांमध्ये सामना

पालिका निवडणुकीचा बहुरंगी महासंग्राम उल्हासनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत

७२ तासांत बदलले तीन पक्ष; मतदार राजाही संभ्रमात!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका

मीरा-भाईंदर महापालिकेत चार माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला

भाईंदर : मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पालिकेत महिलाराजच राहिलेले आहे. या काळात झालेल्या आठपैकी