संत एकनाथ

देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी
देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी
देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी
म्हणोनिया उडी घाली स्वये ॥
नावडे तया आणिक संकल्प।
कीर्तनी विकल्प करिता क्षोभे ॥
साबडे भाळेभोळे नाचताती रंगी।
प्रेम ते अंगी देवाचिये ॥ મો
एका जनार्दनी धाने लवलाहे ।
न तो काही पाहे आपणाते ।


ईश्वराची प्राप्ती व्हावी, त्याची कृपा व्हावी म्हणून आराधनेची जी विविध माध्यमे आहेत, त्यात कीर्तन' हे महत्त्वाचे माध्यम आहे. देवालाही 'कीर्तन' मनापासून प्रिय आहे. 'कीर्तन' म्हणजे काय? कीर्तन म्हणजे नामस्मरण वा नामाचा गजर, परमेश्वराचे गुणवर्णन. करावे कीर्तन। मुखी गावे हरिचे गुण ॥ असे संत तुकारामांनी कीर्तनाविषयी म्हटलं आहे. कीर्तनाचं महत्त्व सांगताना ते म्हणतात, 'नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥ संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला 'धर्मकर्तिन' असे म्हटले आहे.


संतांच्या दृष्टीने 'कीर्तन' ही श्रेष्ठ भक्ती होती. कीर्तनामध्ये गायन, वादन, अभ्यासपूर्ण वक्तृत्व, विनोद अशा अनेक गोष्टी असल्यामुळे, त्यातील भक्तिरंगामुळे ते जनसामान्यांच्या मनात रुजले. कीर्तन हे जनजागृती आणि सामाजिक प्रबोधनाचे मोठे साधन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना स्वातंत्र्ययुद्धाची प्रेरणा देण्यासाठी कीर्तनकारांनी लोकप्रबोधनाचे मोठे काम केले. संत नामदेवांनी "नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥" अशी प्रतिज्ञा केली आणि कीर्तनांद्वारे ती पूर्ण केली.


या अभंगात संत एकनाथ म्हणतात, देवांना कीर्तनाची मोठी आवड असेल तिथं परमेश्वर स्वतः उडी घेऊन त्यात सामील होतो. भक्ताचे संकट निवारण करतो. देवांना कीर्तनाशिवाय भक्तांचे इतर संकल्प आवडत नाहीत. कीर्तनाच्या महतीविषयी, हरिकीर्तनाविषयी कोणी विपरीत बोलल्यास, त्यात अडथळे आणल्यास देवांचा क्षोभ होतो. सरळ, साधे भक्त जेव्हा कीर्तनरंगात आनंदाने नाचूू लागतात. तेव्हा देवालाही प्रेमाचे भरते येते. भक्तांच्या मनात प्रेमभावाचे तरंग उचंबळून येतात.


वारकरी कीर्तन सामूहिक स्वरूपाचे असते. मृदंगवादक, विणेकरी, टाळकरी हे कीर्तनकारांसोबत असतात, भजन, गायन, वादन, निरूपण, दृष्टान्त याद्वारा निरुपणासाठी निवडलेला अभंगाचा भावार्थ उलगडून सांगितला जातो.
संतांनी रुजविलेली कीर्तन परंपरा हा मराठी संस्कृतीचा वैभवशाली ठेवा आहे. वारकरी भक्तिरंगाचा हा प्रभावी आणि गौरवाशाली अाविष्कार आहे.

Comments
Add Comment

समर्थ रामदास

- डॉ. देवीदास पोटे पेरिले ते उगवते पेरिले ते उगवते। बोलल्यासारिखे उत्तर येते। तरी मग कर्कश बोलावे ते। काय

गिरवीचे गोपालकृष्ण मंदिर म्हणजे दक्षिणेतील वृंदावन

सातारा : फलटणपासून १२ किमी. वर गिरवी नावाचं गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला गोपालकृष्ण मंदिर अर्थात भगवान गोपाळ

अंधारातून प्रकाशाकडे

सद्गुरू वामनराव पै, जीवन संगीत । भाग ५ सध्या समाजामध्ये अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. "आपल्या हातात

जेथे भाव तेथे देव

अर्चना सरोदे, मनाचा गाभारा देव लाकडात, पाषाणात किंवा मातीत नसतो, देव भावात असतो म्हणून त्याच्या प्रति असलेला भाव

परमार्थाची गोडी

प्राची परचुरे-वैद्य, आत्मज्ञान मानवी जीवनाचा प्रवास हा केवळ जन्म, उपजीविका आणि मृत्यू यांच्यामधील धावपळ इतकाच

महर्षी वाल्मिकी

डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी anuradh.klkrn@gmil.com राम रामेति मधुरं मधुराक्षरम् | आरुह्य कविताशाखां वन्दे