भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म


मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या कायम आहे. मोबाईल नेटवर्क सुरू करण्याबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) आणि दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मेट्रो स्थानकांतील पायाभूत सुविधांशी जोडणी करण्यासाठी ‘एसीईएस इंडिया’ या त्रयस्थ कंपनीकडून दूरसंचार कंपन्यांना अवाजवी दर आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. या तिढ्याचा तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म असल्याने नियमित प्रवाशांची नेटवर्कअभावी गैरसोय होत आहे.


आरे ते कफ परेडदरम्यान मेट्रो-३ मार्गिकेची भुयारी मेट्रो सेवा सुरू आहे. यातील वरळी ते कफ परेडपर्यंतचा शेवटचा टप्पा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असतानाही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न कायम आहे. मेट्रो मार्गिकेच्या केवळ काही मर्यादित भागांमध्येच वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान मोबाईलवरून बाहेरील संपर्क साधणे शक्य होत नाही. दररोज तिकिटासाठी ५० ते ७० रुपये मोजावे लागतात, तरीही एमएमआरसीएल प्रशासन प्रवाशांसाठी मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करण्यात इतके ढिम्म का? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ‘अॅक्वा लाइन’साठी एमएमआरसीएलने एसीईएस इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांचा आरोप आहे, की एसीईएसकडून नेटवर्क उभारणीसाठी अवाजवी दर आकारले जात आहेत. अनेक बैठका होऊनही तोडगा न निघाल्यामुळे अद्याप काही मेट्रो प्रवाशांना नेटवर्क सुविधा मिळू शकलेली नाही. एका प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीईएसने ११८ कोटी रुपयांचा भांडवली खर्च असल्याचा दावा केला आहे. मात्र, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या अंतर्गत अंदाजानुसार हा खर्च फक्त सुमारे ३० कोटी रुपयांपर्यंत असायला हवा.


सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला मुंबई मेट्रो आणि त्यांच्या विक्रेत्याकडून प्रति स्टेशन १३ लाख रुपये मागितले जात होते. नंतर हे शुल्क कमी करून प्रति स्टेशन ५.५ लाख रुपये करण्यात आले. दुसरीकडे, टीपीएसच्या अंतर्गत गणनेनुसार प्रति स्टेशन दरमहा प्रत्येकी ३९,००० रुपये भांडवली खर्च आणि त्यावर १० टक्के व्यवस्थापन शुल्क देणे अपेक्षित आहे. याच आर्थिक वादामुळे भुयारी मेट्रो मधील नेटवर्क प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही आणि त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.

Comments
Add Comment

जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटी रुपयांना होणार विक्री!

जुहू बीचच्या किनाऱ्यावर वास्तुकलेमुळे आणि किमती परिसरामुळे शहरातील मौल्यवान मालमत्ता मुंबई : मुंबईतील सर्वात

प्रचार सुरू असतानाच शिवसेना उमेदवारावर हल्ला

वांद्र्यातील घटनेने निवडणुकीत खळबळ मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे