आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केली आहे. मतदार विशेष सखोल पडताळणीअंतर्गत झालेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, मतदार यादीत २५ लाखांपेक्षा अधिकांचे नाव एकापेक्षा अनेक ठिकाणी होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मतदारयादीत असणाऱ्या तब्बल १५ कोटी ४४ लाख मतदारांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही नावे मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. आता ६ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. २ कोटी १७ लाख मतदारांची नावे दुसऱ्या यादीत समाविष्ट झाली आहेत. तर, ४६ लाख २३ हजार मतदारांचा मृत्यू झाला आहे. २५ लाख ४७ हजार मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी होती. तर आता उत्तर प्रदेशात २ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार आहेत.
गाजियाबादमधून सर्वाधिक नावे कमी : गाजियाबादमधून सर्वाधिक नावे कमी करण्यात आली आहेत. नव्या ड्राफ्ट मतदार यादीनुसार, गाजियाबादमधून ८ लाख १६ हजार नावे कापण्यात आली आहेत. तसंच, सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून जवळपास ३ लाख मतदारांची नावे कमी झाली आहेत. काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीमधूनही २ लाख ६७ हजार नावे कमी झाली आहेत. यातील अनेकजण इतरत्र स्थायिक झाले आहेत, तर काहींचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण पत्त्यावर सापडले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
१५ हजार पोलिंग स्टेशन्स : निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाकडे ड्राफ्ट मतदार यादीची प्रत दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी म्हटलंय की एका पोलिंग स्टेशनवर १२०० हून अधिक वोटर नसतील. त्यामुळे नवीन पोलिंग स्टेशनही बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ६ दिवसांची मुदत घेण्यात आली होती. परिणामी १५ हजारांहून अधिक पोलिंग स्टेशन बनले आहेत. उत्तर प्रदेशात मतदार विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली होती. २६ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालली. या दरम्यान अनेकवेळा अंतिम मुदत वाढवण्यात आली. या काळात उत्तर प्रदेशातील तब्बल १५.४४ कोटी मतदारांची सखोल चौकशी करण्यात आली.