धाराशिव :उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी येथील रस्त्यावर एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार धारदार हत्यार आणि दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आली. मृताचे नाव शाहूराज महादू सूर्यवंशी (वय ३५) असून, ही घटना रविवारी समोर आली. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध लावला. तपासात समोर आले की, या घटनेमागे अनैतिक संबंध होते.
रविवारी सकाळी नागरिकांना कोरेगाववाडी येथे रस्त्यावरच मृतदेह दिसला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी उपविभागीय अधिकारी शेलार आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.दगडाने चेहरा ठेचल्यामुळे मृताचे चेहरा विद्रुप झाला होता.. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शेजारील शेतकरी आणि नागरिकांशी संपर्क साधला, आणि चार तासांच्या प्रयत्नानंतर मृताची ओळख पटवण्यात यश आले.हत्येच्या शोधासाठी श्वान पथक तैनात करण्यात आले, तर फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी उपस्थित होती. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डचा अभ्यास केल्यावर पोलिसांनी आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे आणि मृताची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले. यादरम्यान चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला.
पोलीसांनी सांगितले की, मृताची पत्नी गौरी आणि आरोपी शिवाजी यांच्यात अनैतिक संबंध होते. यामुळे शाहूराज आणि त्याची पत्नी सतत भांडत असत, आणि या संबंधात अडथळा असल्याने त्यांनी संगनमताने हत्या करण्याचा कट रचला. आरोपींनी रविवारी पहाटे दारू प्यायला दिली आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळील रस्त्यावर शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला पाडले. नंतर हंटर आणि दगडाने जबर मारहाण करून शाहुराज सुर्यवंशी याला संपवण्यात आलं