शेअर बाजारात 'Buy on Dips'? अस्थिरतेमुळे सेन्सेक्स १०२.२० अंकाने व निफ्टी ३७.९५ अंकाने कोसळला

मोहित सोमण: अखेर आज सलग सहाव्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १०२.२० अंकाने घसरत ८४९६१.१४ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ३७.९५ अंकाने घसरत २६१४० पातळीवर स्थिरावला आहे. बँक निर्देशांकातही आज घसरण झाली आहे. आजही बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीत आपला कल वाढवला असल्याने दुसरीकडे बाजारातील सेल ऑफ वाढल्याचे स्पष्ट झाले. फंडामेंटली बाजारात स्थिरता असली तरी तांत्रिकदृष्ट्या बाजारात कंपनीच्या तिमाही निकाला दरम्यान अस्थिरता किरकोळ प्रमाणात वाढल्याने बाजार सपाट पातळीपेक्षा किरकोळ वाढीने घसरले आहे. अखेरच्या सत्रातही बँक,ऑटो, रिअल्टी, पीएसयु बँक, तेल व गॅस या शेअर्समध्ये घसरण झाली असली तरीही आयटी, केमिकल्स, मिडस्मॉल आयटी टेलिकॉम, कंज्यूमर ड्युरेबल्स, फार्मा या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारातील निर्देशांकात घसरण मर्यादित राहिली आहे. नफा बुकिंग होत असताना विशेषतः लार्जकॅप शेअरसह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी वाढल्याचे तेजीच्या निर्देशांकावरून स्पष्ट झाले. युएस व्हेनेझुएला यांच्यातील परिणाम म्हणून बाजार आजही अस्थिरता कायम होती. गेल्या दोन दिवसात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली विक्री सुरूच ठेवल्याने बाजारातील कंसोलिडेशन सुरु राहू शकते असे दिसते.


आतापर्यंत जानेवारी महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ३१२२.७० कोटींची विक्री केली असून घरगुती गुंतवणूकदारांनी ५६१६ कोटींची खरेदी केली आहे. आजही विक्री कायम राहिल्याने बाजारातील सपोर्ट लेवलला धक्का बसला आहे. अखेरच्या सत्रात कमोडिटीतील चढउतार मोठ्या प्रमाणात होत असताना रूपया बाबतीत डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी पुनरागमन केल्याने बाजारात काहीसा आधार मिळाला खासकरून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली विक्री मर्यादित ठेवली होती. आशियाई बाजारातही अखेरच्या सत्रात अस्थिरतेचा संमिश्र कल कायम राहिला आहे.


आशियाई बाजारात गिफ्ट निफ्टीसह निकेयी २२५, हेगसेंग, तैवान वेटेड अशा बाजारातील निर्देशांकात घसरण झाली असली तरी कोसपी,स्ट्रेट टाईम्स, जकार्ता कंपोझिट, सेट कंपोझिट या बाजारातील निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात तेलाच्या सकारात्मकतेमुळे वाढ झाल्याचे दिसते. केएसबी (४०१.९३%), टाटा इलेक्सी (९.५०%), सारेगामा इंडिया (६.७६%), सोनाटा सॉफ्टवेअर (६.०३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण सिप्ला (४.११%), एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (३.८३%), सन टीव्ही नेटवर्क (३.४४%), ओला इलेक्ट्रिक (२.९१%), मारूती सुझुकी (२.७९%), झेड एफ कर्मशिअल (२.७३%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' दैनंदिन चार्टवर निर्णायक घसरत्या ट्रेंडलाइनचा ब्रेकआउट दिल्यानंतर, निर्देशांक सध्या उच्च स्तरांवर स्थिरावत आहे. मोमेंटम इंडिकेटर्स (गती निर्देशक) अनुकूल आहेत, आणि RSI मध्ये तेजीचा क्रॉसओवर दिसून येत आहे. तासाभराच्या चार्टवर, निर्देशांक त्याच्या ५० SMA (Simple Moving Average SMA) पातळीच्या वर टिकून आहे, जो एक मजबूत आधार क्षेत्र (Strong Support Zone) म्हणून काम करत आहे. एकूणच, चार्टची रचना तेजीचा कल दर्शवते.जोपर्यंत निर्देशांक ५९३०० पातळीच्या पातळीच्या वर टिकून राहतो, तोपर्यंत 'घसरणीच्या वेळी खरेदी करा' (बाय-ऑन-डिप्स) ही रणनीती अवलंबली जाऊ शकते. निर्देशांकासाठी तात्काळ आधार ५९७०० पातळीवर आहे, तर प्रतिकार ६०५०० च्या पातळीजवळ दिसून येत आहे.'


आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'भारतीय रुपयाने डिसेंबरच्या मध्यापासूनची सर्वात मोठी एका सत्रातील वाढ नोंदवली आणि डॉलरच्या मागणी-पुरवठ्यातील असंतुलन असूनही तो प्रादेशिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारा ठरला. ही तेजी प्रामुख्याने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक हस्तक्षेपाने प्रेरित झाली होती, कारण आरबीआयने परदेशी भांडवलाच्या सततच्या बहिर्वाहाचा परिणाम निष्प्रभ करण्यासाठी आक्रमक पावले उचलली.


अमेरिका-भारत शुल्क करारांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे बाजारातील भावना संवेदनशील राहिल्या आहेत, ज्यामुळे देशांतर्गत रुपयावर सतत दबाव येत आहे. तथापि, गेल्या दोन दिवसांत आरबीआयने चलनाचे केलेले सक्रिय संरक्षणामुळे, मजबूत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपयाला आवश्यक आधार मिळाला आहे.तांत्रिक दृष्टिकोनातून, स्पॉट USDINR साठी ८९.४० रूपयांवर आधार आणि ९०.३० रूपयांवर प्रतिरोध (Resistance) आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,२६ च्या तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्न आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या नोकऱ्यांच्या आकडेवारीपूर्वी जोखीम-ऑफच्या प्रभावामुळे देशांतर्गत बाजारातील भावना सावध राहते. तिमाहीतील कॉर्पोरेट उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना, जागतिक व्यापार अनिश्चिततेमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) अजूनही जोखीम घेण्यास तयार नाहीत. ऑटो आणि वित्तीय क्षेत्रातील नफा-बुकिंग निर्देशांकांना वजन देते, जरी आयटी, फार्मा आणि मिडकॅप्समध्ये निवडक खरेदीने काही प्रमाणात मदत केली. जागतिक गुंतागुंतीत भर घालत, दुर्मिळ पृथ्वीवरील चीनच्या निर्यात निर्बंधांमुळे पुरवठा साखळीतील जोखीम वाढतात. या मॅक्रो पार्श्वभूमीवर, इक्विटीज श्रेणीबद्ध राहण्याची शक्यता आहे. लार्ज-कॅप थीमवर लक्ष केंद्रित केलेली "बाय-ऑन-डिप्स" रणनीती विवेकपूर्ण दिसते.'

Comments
Add Comment

Nitesh Rane : वसई-विरारमध्ये नितेश राणेंची तोफ! वसई-विरारचा विकास फक्त भाजपच करू शकते मंत्री नितेश राणेंचं आश्वासन

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज नालासोपारा (पूर्व) येथील अचोळे

Highcourt Navi Mumbai Prabhag 17 Election : नवी मुंबईतील प्रभाग १७ (अ) ची निवडणुकीला हायकोर्टाकडून हंगामी स्थगिती; हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या

Donald Trump : ट्रम्पचा रशियाविरोधी कृत्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्तेत येताना युक्रेन युद्ध थांबवण्याचे आणि

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक