नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार (पूर्व), आचोळे गालानगर, विजय नगर, फुलपाडा, कारगिल नगर, कोकण नगर या परिसरातील भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली व चौकसभा पार पडल्या.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केवळ मतदानाचे आवाहन नाही, तर मोठ्या संख्येने या भागात स्थायिक असलेल्या कोकणवासीयांच्या आशा, अपेक्षा आणि भविष्यासाठीचा निर्धार व्यक्त केला. वसई-विरार शहरातील नागरिकांचे गेली कित्येक वर्ष घरांचे प्रश्न आणि पाण्यासारख्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर करून एका १७ वर्षीय मुलाला ...
वसई-विरार महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवून हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा निर्धार आहे. भाजपा-महायुती म्हणजे विकासाचे वचन असून, हे वचन पूर्ण करण्यासाठी जनतेने भाजपा-महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन यावेळी केले. यावेळी नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री.राजन नाईक, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.