Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सला मेहेकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत.



नेमकं काय घडलं?


नागपूरवरून मुंबईच्या दिशेने ही खाजगी बस सुसाट वेगाने धावत असताना, शिवणी पिसा गावाजवळ चालकाला बसमधून धूर येत असल्याचे जाणवले. त्याने वेळ न घालवता तात्काळ बस महामार्गाच्या कडेला उभी केली आणि आरडाओरड करून प्रवाशांना सावध केले. झोपेत असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने संपूर्ण बसला वेढले. काही मिनिटांतच बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.





प्रवासी सुरक्षित, पण जखमींवर उपचार सुरू


या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले असले तरी, घाईघाईत बसमधून उतरताना काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


काही महिन्यांपूर्वी याच समृद्धी महामार्गावर बसला आग लागून २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतरही खाजगी बसेसची तपासणी आणि महामार्गावरील अग्निशमन सुविधांबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. या आगीच्या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Comments
Add Comment

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

Prakash Bharsakhale : अकोटमधील MIM सोबतच्या युती प्रकरणी आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपची कारणे दाखवा नोटीस

अकोट : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार

Imtiaz Jalil vehicle Attack : मोठी बातमी : भर रस्त्यात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर सपासप वार केले अन्... थोडक्यात बचावले; संभाजीनगर हादरले

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली

Dharashiv News : पत्नी ने प्रियकराच्या मदतीने अपल्याच पतीला संपवल;दगडाने ठेचून हत्या..!

धाराशिव :उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी येथील रस्त्यावर एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार धारदार हत्यार आणि

Devendra Fadanvis : महत्वाची बातमी : काँग्रेस-MIM सोबतची युती अजिबात खपवून घेणार नाही; नेत्यांची खैर नाही, देवेंद्र फडणवीस भडकले; आता थेट....

अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काहीही घडू शकते' याची प्रचिती अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या

शनिदेवाच्या दर्शनाआधीच काळाने डाव साधला; मिनी बसच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर : इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण