Quarter Results Update: विभोर स्टील, धनलक्ष्मी बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर महत्वाची माहिती एका क्लिकवर

मोहित सोमण: विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड (Vibhor Steel Tubes Limited), धनलक्ष्मी बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक या तीनही संस्थेचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


१) Vibhor Steel Tubes Limited- कंपनीने आज तिमाही निकाल जाहीर केलेला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, विभोरला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) ५९.५५% वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२६ मधील दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ०.८९ कोटीवरुन १.४२ कोटीवर वाढ झाली आहे. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १९.३४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील २६६.०९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २८१.७६ कोटींवर वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीच्या ईबीटातही इयर ऑन इयर बेसिसवर सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७.१० कोटी तुलनेत या तिमाहीत ९.४१ कोटीवर वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (EBITDA) मार्जिनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.०१% तुलनेत ३.३४% वाढ झाली आहे. तर पीएटी (PAT Margin) इयर ऑन इयर ०.३८% वरून ०.५०% वाढले आहे


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या स्टील ट्युब उत्पादन झालेल्या वाढीमुळे महसूलातही वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. यासह प्रति टन वाढलेल्या महसूलासह कंपनीच्या उत्पादन खर्चात (Manufacturing Cost Control) मुळे मार्जिनमध्ये वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले. हरियाणा स्थित विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेड ही पहिल्या पिढीतील प्रवर्तकांच्या नेतृत्वाखालील कंपनी असून स्टील पाईप्स व ट्यूब्सची एक मोठी उत्पादक, निर्यातदार आणि वितरक आहे. कंपनीचे कार्यक्षेत्र प्रामुख्यानेअभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उत्पादनात आहे. कंपनीच्या उत्पादन व सेवा पोर्टफोलिओत ईआरडब्ल्यू पाईप्स, हॉट-डिप गॅल्वनाइज्ड पाईप्स, हॉलो सेक्शन्स, प्रायमर-पेंटेड पाईप्स, क्रॅश बॅरियर्स, षटकोनी खांब आणि ट्रान्समिशन लाईन टॉवर्ससह विविध प्रकारच्या उत्पादनाचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये २% वाढ झाली असून सकाळी ११.२१ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १.२७% वाढ झाल्याने शेअर १३८.३७ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.


२) Dhanlaxmi Bank- धनलक्ष्मी बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या एकूण व्यवसायात (Total Business) इयर ऑन इयर बेसिसवर २०.७६% वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार पाहिल्यास एकूण व्यवसायात गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २६४४३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३१९३३ कोटींवर वाढ झाली आहे.


बँकेच्या ठेवीत (Deposits) गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील १५०६७ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८.३९% वाढीसह १७८३९ कोटींवर वाढ नोंदवली आहे. बँकेच्या कासा ठेवीत (Current Account Saving Account CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ९.०४% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील ४६०२ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५०१८ कोटीवर वाढ झाली. बँकेच्या सोने तारण कर्ज पुरवठ्यातही तब्बल इयर ऑन इयर बेसिसवर ५०.८९% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ३५५३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५३६१ कोटीवर वाढ झाली आहे. बँकेच्या अँडव्हान्समध्येही इयर ऑन इयर बेसिसवर २३.९०% वाढ नोंदवली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ११३७५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये १४०९४ कोटींवर वाढ नोंदवली आहे. एमएसएमई कर्जातही वाढ झाल्याचे बँकेने म्हटले. आकडेवारीनुसार, ही वाढ गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १६१६ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये २०६४ कोटींवर वाढ झाली आहे जी २७.७२% नोंदवली गेली आहे. निकालानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ४.६९% जवळपास ५% वाढ झाल्याने शेअर सकाळी ११.३३ वाजेपर्यंत २६.१३ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.


३) Capital Small Finance Bank- कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक (Capital Small Finance Bank) तिमाही निकाल जाहीर केला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये प्रोविजनल दिलेल्या माहितीनुसार, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील ८३८४ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १८% वाढ झाल्याने ठेवी ९९३१ कोटींवर पोहोचल्या. बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross Non Performing Assets NPA) कुठलाही बदल झालेला नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये असलेल्या २.७% वरून डिसेंबर महिन्यात २.७% एनपीए कायम आहे. दरम्यान बँकेच्या एकूण अँडव्हान्समध्ये (Gross Advances) इयर ऑन इयर बेसिसवर १९.८% वाढ झाल्याचे बँकेने म्हटले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ७१८४ कोटीवरुन या डिसेंबरमध्ये ८१६४ कोटींवर वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.


बँकेच्या मते, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बँकेची एकूण कर्जे ८१६४ कोटी रूपये होती. इयर ऑन इयर बेसिसवर कर्जात वार्षिक १९.८% वाढ नोंदवली गेल्याचे बँकेच्या व्यवस्थापनाने आकडेवारी स्पष्ट केले. आणि तिमाही बेसिसवर (QoQ) ३.३% वाढ नोंदवली गेली.बँकेच्या आकडेवारी तिमाहीतील वितरित कर्जे वाढून ९१९ कोटी झाली, जी तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY25) मधील ७३७ कोटींच्या तुलनेत २४.७% वाढ दर्शवते. बँकेच्या रिटेल कर्ज देण्याच्या दृष्टिकोनानुसार, कर्ज पोर्टफोलिओ विविध आहे, ज्यात ९८.७% कर्जे सुरक्षित आहेत.


विशेषतः बँकेच्या असेट क्वालिटीत कुठलाही बदल झालेला नाही. बँकेच्या मते वर्षभर अथवा तिमाहीत मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिली असून ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत एकूण एनपीए २.७% होते, जे दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) आणि तिसऱ्या तिमाहीतील (Q3FY25) मधील २.७% च्या तुलनेत समान आहे. याविषयी बोलताना बँकेने,' हे बँकेच्या विवेकपूर्ण अंडररायटिंग, मजबूत वसुली यंत्रणा आणि ससुरक्षित, विविध व लहान-लहान कर्जांच्या पोर्टफोलिओमधील सातत्यपूर्ण भर दर्शवत आहे.एकूण आकडेवारी पाहिल्यास, बँकेच्या एकूण ठेवी ९९३१ कोटींवर पोहोचल्या आहेत. इयर ऑन इयर बेसिसवर १८.५% आणि तिमाही बेसिसवर ६.६% वाढल्या आहेत. कासा ठेवीत (CASA) प्रमाण सुधारले आणि डिसेंबर २०२५ पर्यंत ३५.९% च्या चांगल्या पातळीवर पोहोचले जे सप्टेंबरमध्ये ३३.९% होते. हे स्थिर आणि किफायतशीर ठेव प्रणाली तयार करण्यावर बँकेचे सातत्यपूर्ण लक्ष दर्शवते.


लोन टू डिपोझिट रेशो (Loan to Deposit Ratio) बाबत बँकेने आकडेवारी देताना, ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचे सरासरी सीडी गुणोत्तर प्रमाण ८०.४% नोंदवले असून सप्टेंबर तिमाहीत ८१.६% आणि डिसेंबर तिमाहीत रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ८१.१% होते. ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचे एलसीआर (Liquidity Coverage Ratio LCR)२१५.८२% होते. त्यामुळे बँकेच्या मते बँकेचे आर्थिक फंडामेंटल मजबूत स्थितीत आहे. आज सकाळी बँकेच्या शेअर्समध्ये १% घसरण झाली आहे. सकाळी ११.३३ वाजेपर्यंत बँकेच्या ०.१३% घसरण झाली असून शेअर २७०.३५ रूपये प्रति शेअरवर सुरु आहे.

Comments
Add Comment

१ फेब्रुवारी रोजी रविवार आल्याने अर्थसंकल्प कधी ?

२८ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी १

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

मुंबईकरांच्या सेवेत १८ डब्यांची लोकल लवकरच!

विरार-डहाणू रोड सेक्शनवर १४-१५ जानेवारीला चाचणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी

नगरसेवक बिनविरोध आल्याने काहींना मिर्ची झोंबली!

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला धुळे (प्रतिनिधी) : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या