मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांने व निफ्टी ४५ अंकाने घसरला असल्याने शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. मुख्यतः शेअर बाजारात घसरणीचे सत्र आज दिवसभरात कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यतः रशिया-युक्रेन संघर्ष, इस्त्राईल व इराण यानंतर आता युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात उसळल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. परिणामी बाजारात गुंतवणूकदारांना सावधतेने गुंतवणूक करावी लागेल असे दिसते. तरीही बँक निर्देशांकात किरकोळ वाढ झाल्याने बाजारात काही प्रमाणात किरकोळ स्वरूपातील सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ रिअल्टी, मेटल, मिडिया, मेटल निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण आयटी, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक या निर्देशांकात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एसवीजीएन (४.८५%), हिंदुस्थान कॉपर (४.६३%), एजीस लॉजिस्टिक्स (३.६१%), ज्युबिलएंट इनग्रेव्ह (३.०४%), सोभा (२.८६%), बंधन बँक (२.८५%), सारेगामा इंडिया (२.४९%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण वारी एनर्जीज (३.७७%), टीआरआयएल (३.५५%), एचसीएल टेक्नॉलॉजी (२.८१%), आयडीबीआय बँक (२.७६%), एम अँड एम फिनसर्व्ह (२.५९%), जेबीएम ऑटो (२.५६%) समभागात झाली आहे.
आजच्या सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की, '२०२६ या वर्षाची सुरुवात मोठ्या भूराजकीय घडामोडींनी झाली आहे, ज्यांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या कारवाईमुळे जागतिक भू-राजकारण आणखी अस्थिर होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन संघर्ष अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. इराणमधील निदर्शने अधिक तीव्र होऊ शकतात आणि ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर इराणी राजवट त्यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल; आणि कदाचित चीनही या मोठ्या अनिश्चिततेच्या काळात तैवानच्या विलीनीकरणासाठी याचा फायदा घेऊ शकतो. भूराजकारणातील ही मोठी अनिश्चितता आणि अनपेक्षितता बाजारावरही परिणाम करेल. परिस्थिती कशी वळण घेते हे पाहण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.
व्हेनेझुएलाच्या संकटातून भारतासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे, त्याचा मध्यम ते दीर्घकालीन परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींसाठी नकारात्मक आहे.नजीकच्या काळात बाजार लवचिक राहण्याची शक्यता आहे, कारण सध्या बाजार सर्वकालीन उच्चांकावर आहे आणि ही गती तेजीवाल्यांना पाठिंबा देऊ शकते. बँक निफ्टी मजबूत आहे आणि त्याला प्रभावी कर्ज वाढीमुळे मूलभूत आधार मिळाला आहे. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले लागतील.'
सकाळच्या सत्रातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' शुक्रवारी अप्पर बोलिंगर बँडजवळ झालेली मजबूत क्लोजिंग तेजीची गती कायम राहण्याचे संकेत देत आहे. ऑसिलेटर देखील अनुकूल आहेत. तथापि, अस्थिरता निर्देशांक (VIX) विक्रमी पातळीजवळ असल्याने अस्थिरतेत वाढ होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्यावे. आज आम्ही २६३८० किंवा २६४५०-५५० पातळीपर्यंतच्या अपेक्षांसह बाजारात प्रवेश करू, आणि सुरुवातीच्या तेजीच्या वाटचालीसाठी डाउनसाइड मार्कर २६२८८ जवळ ठेवला आहे.