बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या सूचनांनुसार केकेआरने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला रिलीज केले असून तो आता आगामी आयपीएल हंगामात खेळताना दिसणार नाही. मात्र, आयपीएल २०२६ च्या लिलावात केकेआरने मुस्तफिजूरला तब्बल ९.२० कोटी रुपयांना विकत घेतल्याने आता एकच प्रश्न चर्चेत आहे, मुस्तफिजूरला ९. २०  कोटी मिळणार की नाही?


लिलावात खेळाडू खरेदी केल्यानंतर फ्रँचायझीच्या एकूण बजेटमधून ती रक्कम वजा केली जाते. मात्र, मुस्तफिजूर रहमानचा हा प्रकार दुखापत किंवा वैयक्तिक कारणांमुळे नाही. त्यामुळे यावर आयपीएलचे वेगळे नियम लागू होतात.


आयपीएलच्या नियमांनुसार, जर बीसीसीआयने क्रिकेटशी संबंधित नसलेल्या कारणांसाठी एखाद्या खेळाडूला रिलीज करण्याचे निर्देश दिले, तर त्या परिस्थितीत फ्रँचायझीला त्या खेळाडूवर खर्च केलेली संपूर्ण रक्कम परत मिळते. या प्रकाराला ‘फोर्स मॅज्युअर’ असे म्हटले जाते. ही अशी असाधारण परिस्थिती असते जी फ्रँचायझी किंवा खेळाडू यांच्या नियंत्रणाबाहेर असते. अशा वेळी संघाला खेळाडूसोबत केलेला करार पूर्ण करण्याची सक्ती नसते.


या नियमामुळे केकेआरला मुस्तफिजूर रहमानला कोणतेही पैसे देण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच, ९.२० कोटी रुपयांचा फटका केकेआरला बसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, अलीकडच्या काळात बांगलादेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. या घटनांचा भारतातील धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना सहभागी होऊ न देण्याची मागणी जोर धरू लागली होती. यासाठी विविध स्तरांवर मोहिमाही राबवण्यात आल्या.


या वाढत्या दबावाची दखल घेत बीसीसीआयने ३ जानेवारी रोजी केकेआरला मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्याचे निर्देश दिले. बीसीसीआयचा आदेश मिळताच काही तासांतच कोलकाता नाईट रायडर्सने हा निर्णय जाहीर केला.

Comments
Add Comment

यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला.

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स