मोहित सोमण: कच्च्या तेलाच्या निर्देशांकात पहाटे प्रचंड अस्थिरता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत मोठी हालचाल झाली परंतु टेक्निकल व भूराजकीय पातळीवर कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सुरूवातीच्या ट्रेडिंगमध्ये घसरण होत आहे. सकाळच्या सत्रात दुपारी १ वाजेपर्यंत तेलाच्या किंमतीत ०.८५% घसरण झाली आहे. सकाळी तेलाच्या निर्देशांकात १% पेक्षा अधिक पातळीवर घसरण झाल्याने कच्च्या तेलावर दबाव निर्माण झाला आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर कब्जाच घेतल्याने युएस रिफायनरीला व्हेनेझुएलाचा प्रवेश सुकर झाला आहे. व्हेनेझुएला जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा देश असल्याने युएस तेलाच्या पुरवठ्यात मोठी वाढ झाल्याने किंमतील घसरण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
आज सोमवारी अस्थिर आशियाई व्यापारात तेलाच्या किमतींमध्ये मोठी चढउतार झाली होती कारण अमेरिकेने आठवड्याच्या शेवटी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या लॅटिन अमेरिकन देशावर नियंत्रण मिळवत असल्याचे युएसने जाहीर केले.
यासह भूराजकीय कारणासह येमेनमधील संघर्षामुळे सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यातील वाढलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या व्यापाऱ्यांनी ओपेकच्या तेल उत्पादन अपरिवर्तित ठेवण्याच्या निर्णयावरही विचार केला होता. ज्यामुळे सुरळीत पुरवठा असण्याची शाश्वती निर्माण झाल्याने बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर दबाव निर्माण झाला. उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने आठवड्याच्या शेवटी केलेल्या कारवाईत मादुरो यांना पकडले असून त्यांना आता व्हेनेझुएलाच्या या नेत्यावर न्यूयॉर्कमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप ठेवून खटला चालवला जाणार आहे.
प्रसारमाध्यमांना उत्तर देताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, नवीन नेता निवडला जाईपर्यंत वॉशिंग्टन व्हेनेझुएलाचा कारभार पाहणारे आहे आणि तसेच प्रमुख अमेरिकन तेल कंपन्यांना देशात प्रवेश करून तेथील तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली जाईल ज्याचाही फायदा आज क्रूडवर झाला. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेलसाठा असला तरी देश इन्फ्रास्ट्रक्चर अथवा जुन्या पायाभूत सुविधांमुळे बलदंड नाही. देशातील उत्पादन मंदावले असताना अमेरिकेच्या कठोर निर्बंधांमुळे देशाच्या निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून व्हेनेझुएला जाण्याची दाट शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला किमती ०.५% पर्यंत वाढल्या होत्या परंतु नंतर किंमती घसरू लागल्या.
तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये तेलाच्या किमती १८% पेक्षा जास्त घसरल्या आहेत ज्या गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. मुबलक पुरवठ्याच्या भाकीतामुळे आणि मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाच्या बाजाराला मोठा फटका बसला होता.
याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्लेषकांनी सांगितले की, व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण आल्यास जागतिक पुरवठा वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर आणखी दबाव येऊ शकतो, तथापि, अशा परिस्थितीला प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. ओपेक सदस्य देशांमधील भूराजकीय धोक्यांपेक्षा जागतिक पुरवठ्याच्या सातत्यपूर्ण अतिरिक्ततेच्या अपेक्षा अधिक प्रभावी ठरल्याने कच्च्या तेलाच्या किमती १.३% नी घसरून ५१५५ वर स्थिरावल्या.
अमेरिकेच्या आंशिक नाकेबंदीमुळे व्हेनेझुएलामध्ये पुरवठ्यात व्यत्यय तीव्र झाला आणि विहिरी बंद कराव्या लागल्या असल्या तरी, वाढते उत्पादन आणि मुबलक साठ्यामुळे व्यापक बाजारावर दबाव कायम राहिला. नजीकच्या काळात पुरवठा उपलब्धता वाढेल. ओपेक आपल्या आगामी बैठकीत उत्पादन वाढीला विराम देण्याच्या निर्णयाची पुष्टी करेल अशी व्यापक व्यापारांची अपेक्षा आहे. दुपारी १ वाजेपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures मध्य ०.८९% घसरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ५६.८१ बॅरलवर पोहोचले आहे. Brent Futures निर्देशांकात दुपारी १ वाजेपर्यंत ०.८१% घसरण झाल्याने डॉलरची दरपातळी ६०.२६ प्रति बॅरलवर पोहोचली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्येही (Multi Commodity Exchange MCX) कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.१९% घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति बॅरेल दरपातळी ५१४५ रुपयांवर पोहोचली आहे.