१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी १५ ते २५ जानेवारी दरम्यान विशेष मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, या कालावधीत पुण्यातून धावणाऱ्या अनेक वर्दळीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही गाड्यांचा प्रवास अर्धवट थांबवण्यात येणार आहे.


रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, १५ जानेवारीपासून प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. याचा थेट परिणाम पुणे–सोलापूर आणि पुणे–अमरावती या महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी निघण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.


या कालावधीत प्रामुख्याने पुणे आणि सोलापूर दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे–सोलापूर एक्स्प्रेस आणि सोलापूर–पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या या काळात धावणार नाहीत. तसेच सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे–सोलापूर डीईएमयू, सोलापूर–पुणे डीईएमयू आणि पुणे–दौंड डीईएमयू या गाड्यांचाही समावेश रद्द यादीत आहे.


२३ ते २६ जानेवारी दरम्यान पुणे–अमरावती आणि अमरावती–पुणे एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. याशिवाय अजनी–पुणे एक्स्प्रेस, निजामाबाद–पुणे एक्स्प्रेस, पुणे–नागपूर गरीब रथ तसेच पुणे–नांदेड एक्स्प्रेस या गाड्याही या कालावधीत धावणार नाहीत. मेगा ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यशवंतपूर–चंदीगड एक्स्प्रेस, जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा एक्स्प्रेस या गाड्या मनमाड–इगतपुरी–कल्याण–पनवेल–लोणावळा मार्गे पुण्यात दाखल होतील. तसेच सातारा–दादर एक्स्प्रेस जेजुरी मार्गे, तर तिरुवनंतपुरम–सीएसएमटी एक्स्प्रेस कुर्डुवाडी–मिरज मार्गे धावेल.


काही गाड्यांचा प्रवास दौंडपर्यंत न जाता मधल्या स्थानकावरच थांबवण्यात येणार आहे. इंदूर–दौंड आणि ग्वाल्हेर–दौंड एक्स्प्रेस या गाड्या खडकी स्थानकापर्यंतच धावतील. परतीच्या प्रवासात २४ आणि २५ जानेवारी रोजी दौंड–इंदूर एक्स्प्रेस दौंडऐवजी पुणे स्थानकावरून दुपारी १५:३३ वाजता सुटेल. तर २५ जानेवारी रोजी दौंड–ग्वाल्हेर एक्स्प्रेस खडकी स्थानकावरून रात्री ००:२५ वाजता प्रस्थान करेल.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या

उसतोड पूर्ण झाली आणि घरी परतताना रस्त्यातच परिवाराचा अपघात ; काळीज पिळवटणारी घटना

महाराष्ट्रात गेल्या काही महीन्यांपासून वाहनांच्या अपघातीच्या घटना होत असल्याच पहायला मिळत आहेत. तसंच एका

माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत. आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती. माणगाव :

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी