मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडलेली नाही. तरीही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा करिश्मा असल्यामुळे भाजप शिवसेना महायुतीने रिपब्लिकन पक्षाला महायुतीसोबत घेतले आहे. एकही जागा न देता भाजपने महायुतीच्या प्रचाराचे प्रमुख शिर्ष नेतृत्वात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांना स्थान दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील २९ महापालिकांमध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या फोटोचा वापर होणार आहे. मुंबईत रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महायुतीचा प्रचार होत असतांना मुंबईतच १३ जागांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आठवलेंच्याच पक्षाचे १३ उमेदवार स्वबळावर रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वाचा निळा झेंडा बुलंद करणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढवत असलेल्या १३ जागांपैकी वॉर्ड क्र. २८ मधील यशदा कोंडे, गोरेगांव मधील वॉर्ड क्र. ३८ दिडोंशी मधुन वंदना बोरोडे, वॉर्ड क्र. ५४ मधुन रेशमा खान, बांद्रा पूर्वेत, वार्ड क्र. ९३ मधुन सचिन कासारे, मुलुंड वॉर्ड क्र. १०४ मधुन विनोद जाधव, घाटकोपर पूर्व, रमाबाई कॉलनी वॉर्ड क्र. १२५ मधुन राजा गांगुर्डे आणि वडाळा कोरबा मिठागार वॉर्ड क्र. १८१मधुन बाबा काळे, हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर चांगली लढत देणार असून यांच्यातील काही लोक उमेदवार निश्चित विजयी होवुन रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर मुंबई महापालिकेत यंदा खाते खोलले जाईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी व्यक्त केला आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्या प्रज्ञा सुनिल सदाफुले या चेंबुर पांजरापोळ येथुन महायुतीच्या उमेदवार म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढत आहे. हे ऐकमेव जागा महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या वतीने रिपब्लिकन पक्षाला सोडण्याचा दिलदारपणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला आहे.
दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी हदय विकाराचा त्रास झाल्याने त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पत्नीने सोमा राजेश सरकार यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दाखल केलेला अर्ज मागे घेतला. विक्रोळी (प) सुर्या नगर या भागात राजेश सरकार हे रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रिय कार्यकर्ते आहेत. रिपब्लिकन पक्षाचे विक्रोळी तालुका अध्यक्ष आहेत. या भागात मागील निवडणुकीत सोमा राजेश सरकार यांनी रिपब्लिकन तर्फे निवडणुक लढुन चांगली मते मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीत उ.बा.ठा. च्या नगरसेविका यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. व त्यांनी शिंदे शिवसेना गटाची उमेदवारी मिळवली. त्यामुळे स्थानिक वॉर्ड क्र. १२० मधील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते नाराज आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजगीचे पत्र शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यामुळे वॉर्ड क्र. १२० मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार सोमा राजेश सरकार यांचे पारडे जड मानले जात होते. यंदा सोमा राजेश सरकार हया निश्चित विजयी होतील असे वातावरण होते. मात्र सोमा सरकार यांचे पती राजेश सरकार यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे त्यांनी निवडणुक लढण्याचा निर्णय रद्द केला. निवडणुकीपेक्षा पतीचे आरोग्य महत्वाचे असल्याने त्यांनी निवडणुकीतुन माघार घेतली.