नगरपरिषद निवडणुकीनंतर राणे कुटुंब पहिल्यांदाच मंचावर दिसणार, कणकवलीत महारॅली करणार

​कणकवली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आज रविवार ४ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री आणि कोकणचा बुलंद आवाज खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय धुरळ्यानंतर खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना आमदार निलेश राणे हे संपूर्ण 'राणे कुटुंब' एकत्रितपणे जिल्ह्यात येत असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.


गेल्या काही तासांपासून जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर "मी राणे समर्थक", "एकच ना रा", "आमची ओळख राणे कुटुंबिय" आणि "जय नारायण" अशा आशयाचे पोस्टर झळकत आहेत. २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर जी भावनिक लाट कार्यकर्त्यांमध्ये होती, तसेच वातावरण पुन्हा एकदा दिसत आहे.


राणे समर्थकांनी स्वागतासाठी जय्यत तयारी केली असून, उद्या बांदा ते कणकवली अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. हजारो गाड्यांचा ताफा या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता असून, बांदा येथे राणे कुटुंबियांचे जोरदार स्वागत होईल. त्यानंतर ही रॅली कणकवलीकडे कूच करेल. सायंकाळी ५ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेत खा. नारायण राणे काय भूमिका मांडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

१ फेब्रुवारी रोजी रविवार आल्याने अर्थसंकल्प कधी ?

२८ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी १

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

मुंबईकरांच्या सेवेत १८ डब्यांची लोकल लवकरच!

विरार-डहाणू रोड सेक्शनवर १४-१५ जानेवारीला चाचणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी

नगरसेवक बिनविरोध आल्याने काहींना मिर्ची झोंबली!

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला धुळे (प्रतिनिधी) : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या