शेकाप उमेदवार करुणा नाईक समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शेकाप उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक पदाधिकार्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, तर प्रभाग २ मधील ‘उबाठा’ पदाधिकार्यांनीही भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले.


या पक्षांतरामुळे पनवेलमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका प्रभाग क्रमांक ९ मधील शेकापच्या उमेदवार करुणा नाईक, आसुडगावचे माजी सरपंच नंदकुमार नाईक, माजी सरपंच विजय भोपी, माजी नगरसेवक सुनील नाईक यांंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे प्रभाग २ मधील शिवसेना उबाठाचे तळोजा उपविभागप्रमुख हरेश पाटील, तोंडरे उपशाखाप्रमुख वासुदेव पाटील, सुशांत नाईक, नरेंद्र नाईक, तेजस घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस तथा विनविरोध विजयी झालेले नगरसेवक नितीन पाटील, भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ९चे उमेदवार शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, महादेव मधे; प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार कृष्णा पाटील, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, शंकुनाथ भोईर, सुरेश भोईर, महेश पाटील, अमर उलवेकर, निलेश भोईर, संज्योत शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या पक्षांतरामुळे शेकाप आणि शिवसेना उबाठाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

'ठाकरे बंधूंची भूमिका भेदभावाची, महायुतीची भूमिका बंधूभावाची'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांनी भाषिक भेदभाव आणि

मुंबईत २२ वर्षांत रेन वॉटर हार्वेस्टींगचा नाही पत्ता

इमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ता काळात उबाठाला याची अंमलबजावणी करण्यात अपयश मुंबई : मुंबई महापालिका

नगरसेवक बिनविरोध आल्याने काहींना मिर्ची झोंबली!

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला धुळे (प्रतिनिधी) : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या

मनसेला आणखी धक्का, राजानेही राजाची साथ सोडली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत उबाठासोबत युती केल्यामुळे तसेच महत्वाचे प्रभाग आपल्याला न मिळाल्याने नाराज

नाशिकच्या राजकारणाला कलाटणी दोन माजी महापौरांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मुंबईतील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि