अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अटक


काराकस : ड्रग्जचे कारण देत तेल विहिरींवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केला. यानंतर अमेरिकेच्या डेल्टा फोर्सच्या कमांडोंनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केले. राजधानी काराकसमध्ये झालेल्या स्फोटांनंतर अमेरिकेने तातडीने ही कारवाई केली. सध्या संपूर्ण व्हेनेझुएलामध्ये इमरजन्सी अर्थात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या कमांडो पथकाने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केल्यानंतर लगेच देशाबाहेर नेले आहे. सध्या व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे.


सैन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शत्रूच्या भूमीवर उतरुन अमेरिकेच्या डेल्टा फोर्सच्या कमांडोंनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केले. अमेरिकेने वेगाने आणि हुशारीने केलेल्या कारवाईमुळे व्हेनेझुएलामध्ये नेतृत्वहीन स्थिती निर्माण झाली आहे.


अमेरिकेची डेल्टा फोर्स ही अती कुशल कमांडो टीम म्हणून ओळखली जाते. देशाच्या सुरक्षेला ज्या व्यक्तीमुळे धोका आहे, असे अमेरिकेचे मत होते त्या व्यक्तीला जीवंत अथवा मृतावस्थेत पकडण्याचे काम हे डेल्टा फोर्स करते. दहशतवादी, किडनॅपर अशा अनेक घातक व्यक्तींना पकडण्याचे अथवा ठार करण्याचे काम डेल्टा फोर्सने याआधीही केले आहे.



अमेरिकेने केलेल्या कारवाईमुळे लॅटिन अमेरिकेत राजकीय पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रू या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करुन व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केल्याचे जाहीर केले आहे.


Comments
Add Comment

चीनची लोकसंख्या वर्षभरात ४० लाखांनी घटली; वृद्धांची संख्या वाढली

बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी

पाकिस्तानात लग्नमंडपात आत्मघाती हल्ला; ७ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७

दीड तासांच्या उपचारांसाठी १.६५ लाख

न्यूयॉर्क : अमेरिकेतील आरोग्यसेवेचे विदारक वास्तव दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

जॉर्जियात कौटुंबिक वादातून गोळीबार

भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू अटलांटा : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात कथित कौटुंबिक वादातून झालेल्या

तैवानभोवती चीनचा लष्करी वेढा

२४ तासांत २६ विमाने, ६ युद्धनौकांची घुसखोरी बीजिंग : जगाच्या पाठीवर आधीच रशिया–युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील

इंडोनेशियातील जावा बेटावर भूस्खलन

आठ जणांचा मृत्यू; ८२ बेपत्ता जकार्ता : इंडोनेशियातील जावा या बेटाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी पहाटे