नागपूरमधील धक्कादायक बातमी ; चक्क पोटच्या मुलाला ठेवल ३ महीने साखळदंडणे बांधून

नागपूर : माणुसकीला काळीमा फसणारी गोष्ट उघडकीस आली आहे. घटनेमध्ये दाम्पत्याने आपल्या १२ वर्षाच्या मुलाला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. हे दाम्पत्य मागील तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने मुलाला अशाप्रकारे बांधून ठेवत होतं. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलाची सुटका केली आहे. या प्रकरणी अजनी पोलीस गुन्हा दाखल केला आहे.


नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे आई-वडील मोलमजुरीचे काम करतात. कामाच्या निमित्ताने त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत मुलगा काही चुकीच्या सवयींकडे वळला होता, चुकीचं वागत होता. त्याला समजावून सांगितलं तरी ऐकत नव्हता, असा दावा आई-वडिलांनी केला आहे. मुलाला वठणीवर आणण्यासाठी त्यांनी चक्क त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्याचा अघोरी मार्ग निवडला. गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून हा क्रूर प्रकार सुरू होता. आई-वडील कामावर जाताना मुलाच्या पायाला साखळदंड बांधून त्याला कुलूप लावलं जात होतं. आई वडील कामावरून परतल्यावर त्याला मोकळं केलं जात होतं.


पायाला जखमा आणि चाईल्ड हेल्पलाईनची कारवाई


साखळदंडाने बांधून ठेवल्यामुळे त्या लहान मुलाच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. अशा वागणुकीची माहिती 'चाईल्ड हेल्पलाईन'ला मिळाली. माहिती मिळताच पथकाने तातडीने अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या घटनास्थळी धाव घेतली. तिथे मुलाची अवस्था पाहून पथकही हादरून गेले. शेवटी पोलिसांनी मुलाची सुटका केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलाला सध्या बालगृहात हलवण्यात आले असून, तिथे त्याच्यावर उपचार आणि समुपदेशन सुरू आहे. शिस्तीच्या नावाखाली पोटच्या मुलाला अशा प्रकारे साखळदंडाने बांधून ठेवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

अजित पवारांच्या अस्थी नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

मुंबई: दि.१ फेब्रुवारी - आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प : मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या

आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे