ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध


मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याचे काम हाती घेतले आहे. डिसेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून केंद्र सरकारने या कामासाठी ६८ कोटींचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध करुन दिला आहे.


सन २०२५-२६ च्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विशेष सहाय्य (कर्ज) च्या भाग-१ अंतर्गत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी २०० कोटींच्या निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र शासनाने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी एकूण २०० कोटींचा निधी मंजूर केला असून मंजूर रकमेपैकी ६८ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.


शहरातील पूर्व मुक्तमार्गाजवळील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी मार्गाचे बांधकामासाठी १३५४ कोटी रकमेचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य प्राधिकरणाला उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आराखड्यानुसार प्रकल्पावरील केंद्रीय कराच्या ५० टक्के रक्कम ३०७.२२ कोटी, राज्य स्तरीय करांसाठी ६१४.४४ कोटी आणि खाजगी व शासकीय जमीन कायमस्वरुपी व तात्पुरत्या स्वरुपातील जागा उपलब्ध करुन देण्याबाबतचा खर्चाची तरतूद ४३३ कोटी असे एकूण १३५४.६६ कोटी बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य राज्य शासनाकडून प्राधिकरणाला उपलब्ध करुन द्यावयाचे आहे.


मुंबई शहरातील पूर्व मुक्तमार्गाजवळील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी मार्गाचे बांधकाम प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ६८ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

Comments
Add Comment

मेट्रो-११ मार्गिकेसाठी होणार सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई : वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशा मेट्रो ११ मार्गिकेसाठी अंतरिम प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी

गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचा खर्च वाढला

संजय गांधी उद्यानातील दुहेरी बोगद्याच्या पर्यायी कामांसाठी वाढला एक हजार कोटींचा खर्च मुंबई : गोरेगाव मुलुंड

मुंबई महापौर,उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ?

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

कमी दृश्यमानता ठरली अपघाताचे कारण ?

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज म्हणजेच बुधवार २८

Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर मनोरंजन विश्वातिल मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री