आयपीएलमध्ये एकाही बांगलादेशी खेळाडूला खेळू देणार नाही

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा इशारा


मुंबई : ज्याप्रकारे हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत. हिंदूंना जिवंत जाळलं जात आहे आणि ज्याप्रकारे बांगलादेश भारतविरोधी भूमिका घेत आहे. हे पाहता बांगलादेशच्या कोणत्याही खेळाडूला आम्ही आयपीएलमध्ये खेळू देणार नाही. ही राष्ट्रवादाची बाब आहे, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडतोज केली जाणार नाही. एकाही बांगलादेशी खेळाडूस मुंबईत खेळू देणार नाही, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी इशारा दिला आहे.


बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सातत्याने अल्पसंख्यांकांवर विशेषकरून हिंदूंवर जीवघेण्या हल्ल्याच्या आणि त्यांच्या निर्घृण हत्येच्या घटना घडत आहेत. यावरून बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारत सरकारने या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत बांगलादेश सरकारला जाब विचारला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनांवरून बांगलादेश सरकारवर टीका सुरू आहे.


मात्र असे जरी असले तरीही अद्यापपर्यंत या घटना थांबल्याचे दिसत नाही. हिंदूंवर अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. अमित साटम म्हणाले की, हेच कारण आहे की बीसीसीआयने हे फर्मांन काढले आहे. मग तो शाहरुख खानच्या संघामधील असेल किंवा आणखी एका संघाचा, बांगलादेशी खेळाडूंना कोणत्याही आयपीएल संघात खेळू देणार नाही. असेही साटम यांनी म्हटले आहे.


न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी उमर खालीद बाबत केलेल्या विधानावर बोलताना अमित साटम म्हणाले, काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ज्याप्रकारे इस्लामी जिहादींनी कब्जा करून तेथील रंग बदलला आहे. त्याचप्रकारे मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि हा एक आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेस, सपा, एमआयएम, ठाकरे देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मुंबईकर जागरूक आहेत. मुंबईचा रंग बदलण्याचे असे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही मुंबईचे मोमडियेनाइजेशन होऊ देणार नाही’.

Comments
Add Comment

डॉ लाल पॅथलॅब्सने 'सोवाका' या वेलनेस इंटिग्रेटेड केंद्राची स्थापना केली

मोहित सोमण: सध्या बाजारात एफएमसीजी, हेल्थेअर क्षेत्रातील जनजागृती होत असताना डॉ. लाल पॅथलॅब्सने (Dr Lal Path Labs Limited)

HSBC Service PMI Index: उत्पादनाला मागे टाकत सेवा क्षेत्राची नवी 'घौडदौड' कॉर्पोरेट क्षेत्राच्या नफ्यात ३ वर्षांतील सर्वाधिक वाढ

मोहित सोमण: एचएसबीसी पीएमआय सर्विस इंडेक्स (HSBC India Services PMI Index) अहवालाप्रमाणे, उत्पादन क्षेत्राला (Manufacturing Sectors) मागे टाकत

Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या

एलआयसीकडून धमाकेदार 'एलआयसी जीवन उत्सव ' विमा योजना जाहीर, जबरदस्त परताव्यासह कर्जही मिळणार

मोहित सोमण: एलआयसी (Life Insurance Corporation of India LIC) गुंतवणूकदारांसाठी धमाकेदार विमा योजना घेऊन आली आहे. 'एलआयसी जीवन उत्सव ' (LIC Jeevan

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर न्यायालयाची दखल; बजरंग दल प्रकरणी पोलिस तपास सुरू

मुंबई : काँग्रेसने २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात बजरंग दलवर बंदी घालण्याचं आश्वासन

आजचे Top Stock Picks- एचडीएफसीसह 'हे' ४ शेअर खरेदीचा मोतीलाल ओसवालकडून सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस ब्रोकरेज कंपनीने गुंतवणूकदारांना काही शेअर चांगल्या